वीजचोरी पकडल्यामुळे नवीन मीटरच्या मागणीत वाढ

धाडसत्रामुळे ग्राहकांमध्ये उडाली एकच खळबळ

0

रफीक कनोजे, झरी: गोरगरीब आदिवासी जनता अंधारमुक्त व्हावे याकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केल्या जात आहे. त्यासाठी सवलतीच्या योजनाही राबविण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत विजचोरीचे प्रमाणही वाढत आहे. झरी उपविभागीय विद्युत वितरण कंपनी कार्यालय अंतर्गत मुकूटबन, पाटण व घोंसा विद्युत कार्यालयाद्वारे शंभरहुन अधिक वीज चोरट्यांना पकडल्यामुळे नवीन मीटरसाठी ४०० ते ५०० लोकानी नवीन मीटरसाठी अर्ज केलेले आहेत. मुकुटबन कार्यालय अंतर्गत नवीन घरगुती विद्युत मीटर पुरवठ्या करीता जवळपास २००च्या वर विद्युत ग्राहकानी डिमांड भरलेले आहे. कित्येक महिन्यांपासून विद्युत मीटर न मिळाल्यामुळे वीज वितरण कंपनी विरुद्ध जनतेत रोष आहे.

झरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून मुकूटबनची ओळख आहे. परंतु गेल्या नऊ महिन्यांपासुन मुकुटबनचा विद्युत विभाग प्रभारीच्या भरवस्यावर. असुन दोन ते तीन महीन्यात प्रभार बदलवील्या जातो. इथे मुख्यालयी विद्युत अभियंता राहात नाह्री. प्रभारी अभियंता असल्यामुळे आठवड्यातून दोनच दिवस कार्यालयात येतात. त्यामुळे मुकूटबन कार्यालय बंदच राहाते. परीणामी विद्युत ग्राहकांना झरी उपविभागीय कार्यालयात समस्यासांठी पायपीट करावी लागते.

झरी येथील विद्युत उपकार्यकारी अभियंता राहुल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाच्या विज चोरी भरारी पथकाने आजपर्यंत १०० हुन अधिक विजचोरी करणार्या लोकांवर कारवाई केली, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तर काही लोकानी दंड न भरल्यामुळे त्या लोकावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अनेक वीज चोरट्याचे धाबे दणानलेले असुन नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज भरुन पैसे सुध्दा भरलेले आहेत.

विज नियमाप्रमाणे नवीन घरगुती वीजधारकांना एक महिन्याच्या आत नवीन मीटर देणे बंधनकारक असताना विज चोरी पकडल्यामुळे नवीन मीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. पण गेल्या कित्येक दिवसांपासून नवीन मीटर दिल्या जात नाही. नवीन मीटर न बसविल्यामुळे वीज चोरीचे प्रमाण वाढत आहे. ह्याकडे सुद्धा विज वितरण कंपनीने लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे.

ह्यापूर्वी वीज वितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे कागदोपत्री नसलेल्याना एक, दोन दिवसात मीटर दिले. परंतु आजरोजी कित्येक महीन्यापासून डिमांड भरलेल्या ग्राहकांना अजूनही मिटर दिले जात नाही. जो चिरीमिरी देईल किवा राजकीय दबाव आणेल अश्याच लोकांना मीटर दिल्या जाते अशी जनतेत चर्चा आहे. पैसे भरले आहे त्यांना मीटर त्वरित द्यावे व मुकूटबन येथे कायमस्वरुपी अभियंत्याची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी जनता करीत आहे. उपविभागीय विद्युत वितरण कंपनी झरी मार्फत वीज चोरी पकडण्याचे काम भरारी पथकाद्वारे मोहीम सतत सुरु राहील अशी माहिती मिळाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.