मुकुटबन ते बोरी मार्गावरील विविध पुलांचे काम बंद अवस्थेत

धुळीमुळे प्रवासी त्रस्त, ठेकेदाराचा मनमानी कारभार

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराच्या मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु मुकूटबन ते पाटण या 14 किमी अंतराच्या कामात 18 पुलांचे काम सुरू आहे. पण यातील बहुतांश पुलाचे काम बंद अवस्थेत आहे. पुलाच्या प्रत्येक कामाजवळ वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. वळण रस्त्यावर माती दगडामुळे लहान मोठे अपघात होत आहे व धूळ उडत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

Podar School 2025

ठेकेदारांना वळण रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक असताना मुजोर ठेकेदार कोणत्याही वळण रस्त्यावर पाणी मारत नाही. उलट तुम्हाला जे करायचे ते करा, जिथे तक्रार करायची तिथे करा अशी शिरजोरी करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताव व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पुलाच्या कामाजवळ रेती गिट्टी व माती चे ढिगारे असल्यामुळे दुचाकीस्वार पडत असल्याचे दिसत आहे. पुलाच्या काम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी रस्ता वळण चे दिशाफलक सुद्धा नाही त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होत आहे व अपघात होत आहे.

पूलाचे काम करणारे ठेकेदारांना जनतेच्याअ आरोग्य व जीवाशी काहीच घेणे देणे नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुलाच्या कामामुळे किंवा धूळ ,दगडामुळे अपघात होऊन कुणाचेही जीव गेल्यास याला जवाबदार ठेकेदार राहणार काय असा संतप्त प्रश्न वाहन चालक करीत आहे.

सफर कामाकडे संबंधीत अभियंता व लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्यामुळे मुजोर ठेकेदार आपले मनमानी कारभार करीत आहे. तरी पाटण पर्यंत सुरू असलेले पुलाजवळील सर्व वळण रस्ता सुरळीत करून पाणी मारावे अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.