झाला संवाद, जुळलीत मने, आता फुलतील स्वप्नांचे संसार 

नाभिक समाजाचा शेकडो उपवधू -उपवरांसह परिचय व समाज मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शाखेने उपवधू-उपवर परीचय सोहळा व राज्यस्तरीय नाभिक समाज मेळावा घेतला. हा सोहळा आणि मेळावा स्थानिक शेतकरी मंदिरात शनिवारी झाला. या वधू-वर परिचय  मेळाव्याची सुरुवात प्रमुख अतिथींच्या  हस्ते  दीप प्रज्वलनाने झाली. नंतर संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे होते. उद्घाटन शाळा संस्थापक राजेंद्र नागतुरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरुवार, संजय खाडे, प्रदीप बोनगिनवार, निवृत्ती पिस्तुलकर, गजानन वाघमारे, शोभा नक्षीने, विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष, उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत  कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, सामाजिक कार्यकर्ते, व  गुणवंतांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात शेकडो उपवधू आणि उपवरांनी  आपला परिचय दिला. सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र समाजभूषण, समाजगौरव, विशेष गौरव सम्मान, समाज विचार मंथन आदी पुरस्कारांनी समाजबांधवाचा सत्कार करण्यात आला.

नाभिक समाजातील  हजारोंच्या संख्येने समाजबांधव समाज मेळाव्यास सहपरिवारासह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे  यवतमाळ जिल्हाध्यक्ष  डुड्डूभाऊ नक्षीने  यांच्या  अथक परिश्रमातून कार्यक्रमाला यशस्वी झाला. त्यांचे सहकारी निखिल मांडवकर, अभय नागतुरे, लक्ष्मण चंद्रकांत नक्षीने, विनोद धाबेकर, तेजस नक्षीने, प्रज्वल नागतुरे, मनोज चौधरी, अजय डांडे, नक्षीने, जितेंद्र घुमे, 

आयोजक शहराध्यक्ष दिलीप वनकर त्यांचे इतर सहकारी,यांचे मोलाचे सहकार्य राहिले. या कार्यक्रमाचे संचालन आपल्या  ओजस्वी वाणीतून महिला प्रदेश कार्याध्यक्ष सरोज चांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या  समाजबांधवांची व्यवस्था आणि आदरातित्थ आयोजकांनी केले.

Comments are closed.