वणी शहरातील विकासावर भाजपच्या प्रचाराचा भर
उर्वरीत कामांसाठी मतदारांचा संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आग्रह
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या अधिकृत प्रचार सुरु झाला नसला तरी गृहभेट आणि कॉर्नर सभेतून प्रचाराचा जोर सुरु झाला आहे. भाजपचा सध्या मा. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम व भाजपच्या नगरसेवकांसाठी धडाक्यात प्रचार सुरु आहे. त्याला शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी व भाजपच्या स्थानिक नेत्यांची उत्तम साथ लाभत आहे. सध्या भाजपचा संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या 10 वर्षांच्या कार्याकाळात झालेल्या विकासाकामांचा दाखला देत प्रचार सुरु आहे. त्याला मतदारांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या दशकभराच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आले. ज्या भागात वर्षानुवर्षे रस्ते नव्हते तिथे रस्ते झाले. जिथे अंधार होता, ते भाग पथदिव्यांनी उजळले; जिथे पाण्याची कमतरता होती, तिथे पाईपलाईन पोहोचली; ओपन स्पेसमध्ये बागा फुलल्या आणि मुख्य रस्ते सिमेंटचे झाले.
या कामांमुळे बोदकुरवार यांची लोकप्रियता वाढली. आज संजीवरेड्डी बोदकुरवार जर आमदार नसले तरी आजही ते मुख्यमंत्री, मंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून प्रस्तावित कामांचा पाठपुरावा करत आहेत. ते ज्या भागात प्रचाराला जात आहेत. त्या भागात झालेल्या विकासकामांचा ते दाखला देत आहे. तसेच त्या व्यक्तिरिक्त मतदारांच्या इतर समस्याही ते ऐकून घेत आहे.
उर्वरित कामांसाठी संधी द्या
नगरपालिका निवडणुकीत भाजपने विकासकामांना केंद्रस्थानी ठेवले आहे. नगरपालिका निवडणुकीत वणीचा विकास हीच प्रचाराची लाईन चालवण्यात येत आहे. मा. आ. बोदकुरवार यांनी झालेल्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना उर्वरित कामे पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे प्रचार रॅली आणि सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दाखवते की वणीकरांना विकासाची ओळख असलेल्या नेतृत्वावर अजूनही विश्वास आहे.
वणीच्या राजकारणात विकास हा केवळ घोषणांचा विषय राहिलेला नाही, तर तो प्रत्यक्षात अनुभवलेला बदल ठरला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा हीच बोदकुरवार यांच्या कार्याची ओळख बनली आहे. आजही ते प्रस्तावित कामांचा पाठपुरावा करत असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास मतांमध्ये किती रूपांतरित होतो, यावर वणीच्या विकासाची पुढील दिशा ठरेल.



Comments are closed.