रंगनाथ नगर येथील यशोदाबाई बापूराव चाटे यांचे निधन

आज दु. 12 वाजता अंत्यसंस्कार, राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: रंगनाथ नगर येथिल रहिवासी असलेले बापूराव यलन्ना चाटे यांच्या पत्नी तथा रमेश बापुराव चाटे यांची आई यशोदाबाई बापुराव चाटे वय अंदाजे 100 वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी दिनांक 30 ऑक्टोबर 2024 ला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा चाटे यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुली, जावई, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. वणीतील पत्रकार सूरज चाटे यांच्या त्या आजी आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.