पुरुषोत्तम नवघरे, वणी: जागतिक महिलादिन सर्वत्र साजरा होत आहे. यामागे अनेक महामानवांची प्रेरणा आहे. भारतीय परिप्रेक्षांत छत्रपती शाहू महाराज, क्रांतज्योती महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांची प्रेरणा या दिनानिमित्त पुन्हा मिळावी म्हणून घोन्सा येथे निशा धोंगडे यांचे प्रबोधन होणार आहे.
हे प्रबोधन बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ ला. रात्री ८ वाजता घोन्सा येथील श्री संत गजानन महाराज श्रध्दाश्रम येथे होईल. शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे हे संगितमय प्रबोधन आहे. त्यातील ‘ये माय…! फोटो लावा घरो घरी गं..!’ हा भाग पराकोटीची उत्कंठा वाढवणारा आहे.
कोण आहेत ह्या निशा धोंगडे?
प्रबोधनकार निशा धोंगडें ह्या महाराष्ट्राच्या सुप्रसिध्द ग्रायिका, प्रबोधनकार, सिने अभिनेत्री तथा नाट्यकलावंत आहेत. छत्रपती शाहू महाराज, क्रांतज्योती महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ते आपल्या प्रबोधनांतून जनसामान्यांपर्यंत पोहचवतात. आजपर्यंत त्यांनी शेकडो विचारमंच गाजवले. संगीत आणि अभिनयाची त्यांना उत्तम जाण आहे. आपल्या प्रतिभेने ते रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवतात. त्यांनी आपल्या अनेक कार्यक्रमांतून प्रबोधनांसह भरभरून रसिकांचं मनोरंजन केलं आहे.
या आयोजनासाठी योगिराज महिला बचत गट, समृध्दी महिला बचत गट, दुर्गाशक्ती महिला बचत गट, गुर्गा महिला बचत गट, अस्मिता महिला बचत गट, श्रमिक महिला बचत गट, सुरक्षा महिला बचत गट, जय पेरसापेन महिला बचत गट, अन्नपूर्णा महिला बचत गट, जयशक्ती महिला बचत गट, गुलाब महिला बचत गट, सह्याद्री महिला बचत गट,
प्रतीक्षा महिला बचत गट, गायत्री महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट, जय सेवा महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, महाशक्ती महिला बचत गट, रमाबाई महिला बचत गट, भाग्यश्री महिला बचत गट, श्री साई महिला बचत गट, पंचशिल महिला बचत गट, जान्हवी महिला बचत गट, सखी मंच महिला बचत गट,
स्त्रिशक्ती महिला बचत गट, गृहलक्ष्मी महिला बचत गट, संतोषी महिला बचत गट, निशा महिला बचत गट, सोहेल महिला बचत गट, सिताराम महिला बचत गट, अंबिका महिला बचत गट, रामराज्य महिला बचत गट, रामकृष्ण महिला बचत गट, धनश्री महिला बचत गट, उन्नती महिला बचत गट, झिंगभोई महिला बचत गट, राधाकृष्ण महिला बचत गट, श्री लक्ष्मी महिला बचत गट, निर्मला महिला महिला बचत गट,
आदिशक्ती महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, स्वामीनी महिला बचत गट, भोईराज महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, घोन्सा तथा परिसरातील बोर्डा, रासा, दहेगांव, सोनेगांव, येसापूर, उमरघाट, सुर्ला, झमकोला, दरारा, वाढीणा (बंदी), अनंतपूर, कुंभारखनी कॉलनी येथील महिला बचत गट व समस्त ग्रामवासी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Comments are closed.