मकर संक्रांतिनिमित्त पहाड वनमाळी समाजाचे स्नेहमिलन

स्त्रीशक्तीच्या क्षमता आणि प्रतिभांवर विशेष फोकस

बहुगुणी डेस्क: वणी: स्त्री ही निर्माती आहे. तिच्यात अनेकविध क्षमता आणि प्रतिभा आहेत. हे सिद्घ करणारे अनेक कार्यक्रम मकर संक्रांतिनिमित्त झालेत. नुकताच पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम स्थानिक नगर वाचनालय सभागृह येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला रामभाऊ गोलाईत होत्या. शीतल प्रफुल गोलाईत आणि माया नारायण सोनकर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या.

स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. त्यांचा सन्मान करावा. अनेकविध क्षेत्रांत त्या भरारी घेत आहेत. समाजातील सर्व स्त्रिया एकत्र येऊन अनेक उपक्रम आणि प्रकल्प राबवू शकतात. सोबतच पहाड वनमाळी समाजाच्या कार्याचा आढावा समाजाचे अध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याप्रसंगी बोलताना शितल गोलाईत म्हणाल्या की, स्त्रियांनी आपल्या कक्षा व्यापक केल्या पाहिजे. नव्या पिढीकडून देखील बरच काही शिकण्यासारखं आहे. स्त्री ही जगद्जननीचं स्वरूप आहे.

यावेळी माया सोनकर यांनी भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकला. स्नेहमिलनात सारख्या सोहळ्यांतून भेटीगाठी होतात. विचारांची देवाण-घेवाण होते. कृतीत आणण्या सारख्या नव्या संकल्पना सुचतात. समाजाचं संघटन आणि एकी खूप महत्त्वाची असते.

या स्नेहमिलन सोहळ्याला वणी शहरातील समाजातील आबालवृद्ध स्त्रियांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे संचालन प्रिया सुतसोनकर यांनी केले. आरती काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed.