‘या’ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी फिजिओथेरपी ठरतये वरदान
वणी बहुगुणी डेस्क: आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानव हा एका यंत्राप्रमाणे काम करू लागला आहे. मानवाच्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. यासाठीच माणूस डॉक्टरांकडे सतत धाव घेऊन अनेक घातक अशा औषधांचे सेवन करतो. बरेचसे असे आजार आहेत, जे औषधाविनासुद्धा बरे होऊ शकतात आणि त्यासाठी फिजिओथेरपी ही आधुनिक उपचारपद्धत वरदान ठरत आहे.
पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, सांध्याचे विकार, स्नायुदुखी, संधिवात, खांदेदुखी, सायटिका, फ्रॅक्चरसंबंधित विकार, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम, पॅरालिसिस, पोलिओ, पार्किन्सोनिझम, सेरेब्रल पाल्सी, चेहर्याचा पॅरालिसिस, पोस्ट कोविड उपचार या सर्व आजारांवर फिजिओथेरपी खूप फायदेशीर ठरत आहे. फिजिओथेरपीची वाढती गरज लक्षात घेता शहरातील नांदेपेरा मार्गावर नुकतेच रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.
अद्यावत सुविधा असलेल्या या क्लिनिक मध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, टेन्स, आय.एफ.टी., सि.पी.एम., ट्रॅक्शन, मसल्स स्टीम्युलेटर ही प्रामुख्याने दुखणे कमी करण्याची उपकरणे आहेत. शिवाय स्टॅटिक सायकल, शोल्डर व्हील, थेरा बॉल इत्यादी व्यायाम उपकरणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे संचालक डॉ. रौनक कोठारी (B.PTh. CDNT) हे महाराष्ट्र स्टेट ऑक्युपेशनल थेरेपी आणि फिजिओथेरपी कौन्सिल (OTPT) चे नोंदणीकृत चिकित्सक आहे. त्यांनी कायरो प्रॅक्टिक, ड्राय निडलिंग व कपिंग थेरपीमध्येही प्रावीण्यता मिळविली आहे. सायटिका, कंबरदुखी, मानदुखी, सर्वायकल स्पॉंडिलिसिस, फ्रोझन शोल्डर या आजारावर कायरोप्रॅक्टिक पद्धतीने या क्लिनिकमध्ये निदान केल्या जाते.
घरीच फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध
शस्त्रक्रिया झालेले, लकवाग्रस्त, तसेच चालण्यास असमर्थ असलेल्या वृद्ध रुग्णाच्या घरी जाऊन (Home Visit) फिजिओथेरपी करण्याची सुविधा या क्लिनिक मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये महिला रुग्णांवर फिजओथेरपीसाठी स्वतंत्र कक्ष व महिला परिचारिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
पत्ता – रिलिफ फिजिओथेरपी क्लिनिक
नगराळे हॉस्पिटल समोर, नांदेपेरा रोड, वणी
फोन नंबर – 8378809915
Comments are closed.