पोळा स्पेशल: शेतकरी अडचणीत पोळा का भरवतात ?

बळीवंश आज आत्महत्त्या का करतात ?

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: खरिप हंगामात पेरणी आटोपलेला आजचा शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाने पुरता आर्थिक दृष्ट्या खचलेला आहे. कर्जानं त्याचं कंबरडं मोडलं आहे. ज्यावेळी मंदीचा काळ असतो, त्याचवेळी शेतकऱ्याचा सण बैलपोळा येतो, त्यावेळी शेतकरी येडीच देडी करुन पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो, पण हा सण का साजरा करतो याचे कारण शोधले असता महाराष्ट्रातील विचारवंत व लेखक आ. ह. साळुंखे यांच्या व्याख्यानात बैलपोळ्या संबंधात एक ओझरती कथा ऐकली होती. त्यावेळी वास्तव शेतकऱ्याचा वैभवशालाली राजा बळीराजा यांच्या वरील प्रेमापोटी शेतकरी पोळा भरवत असल्याच संशोधन आ.ह.साळुंखेंचं आहे. आजच्या शेतकऱ्यानी ती कथा माहीत व्हावी म्हणून हा लेखप्रपंच….

ती कथा अशी आहे की ज्यावेळी वामणाने दानशुर असलेला बळीराजाला कपटाने तीन पावलावर दान मागून पहिल्या पावलात आकाश व्यापले, दुस-या पावलाने पृथ्वी व्यापली, आता बळीराजा जवळ काहीही शिल्लक नसताना वामणान शिल्लक असलेल तिसऱ्या पावलाच दान मागताच बळीराजा म्हणाला तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. त्यावेळी वामणाने तिसरे पाऊल बळिराजाच्या मस्तकावर ठेवताच बळीराजाला वामणाने पाताळात गाडलं, त्यावेळी बळीराजाची प्रजा अत्यंत दु:खी झाली आणि वामणाकडे याचना करून बळीराजाला वर्षातून एकदा प्रजेला भेटण्यासाठी दिवस ठरविल्या गेला. तो म्हणजे पोळ्याचा दिवस होय.

बळिवंश या आ. ह. साळुंखे यांच्या ग्रंथात उल्लेख आहे की ज्यावेळी वामणाने बळीराजाच राज्य कपटाने हस्तगत केले त्यावेळी बळीराजाची प्रजा दरिद्री झाली होती, ठरल्याप्रमाणे बळीराजा आपल्या प्रजेला म्हणजे शेतक-यांना भेटण्यासाठी बाहेर येत होता, त्यावेळी आपल्या राजाला आपलं दारिद्रय दिसू नये म्हणून आपल्या लेकराबाळाला आणि बैलाला छान सजवून गावच्या गोठाणावर बळीराजाच्या स्वागताला आपले दारिद्रय लपवत बळीराजाला आपले कोणतेच दु:ख दिसू न देता मोठ्या अंतकरणाने स्वागत करायचे.

बळीराजा पृथ्वीवर आल्यावर आपली प्रजा आनंदात आहे हे पाहून बळीराजा आनंदाने पाताळात परत जायचा, पण बळीराजाची प्रजा आतुन दु:खी अंतकरनाने बळीराजाला निरोप देत दुस-या दिवशी नेहमीच दरिद्रय घेउन जगायचे. याच कारण एकच होत ते म्हणजे प्रजेचं बळीराजावरिल प्रेम… बळिराजावरील प्रेमापोटी आजही शेतक-याचं प्रेम कायम आहे. याचं प्रतिक म्हणजे आजचा शेतक-यांचा सण पोळा असू शकतो.

बळीराजा हा महिलेचा सन्मान करणारा राजा होता त्याचा प्रत्येय दिवाळी सणाच्या दरम्यान येतो. कारण आपल्या भावाला ओवाळण्यासाठी बहिण भावाकडे माहेरी येते तेव्हा सुद्धा ती आपल्या भावाला म्हणते इडा, पिडा जाऊ दे अन् बळीचे राज्य येऊ दे. याचा अर्थ हाच होतो की बळीराजा दानशूर, महिलेचा सन्मान करणारा एकवचनी, प्रजावत्सल होता.

पण आजचे सरकार शेतक-यांचे कोणतेच हित न पाहता, ख-या अर्थानं वामणाची भूमिका वठवीत आहे, दोन महिन्यापासून दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकून आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी गळफास घेतो. नाहीतर किटक नाशक घेऊन आपले जीवन संपवितो. सिंहासनावर बसण्यापुर्वी प्रजेची सर्व प्रकारच्या संरक्षणाची जबाबदारी घेणारा शासनकर्ता राजा हा बळीराजा वाली नसून शेटजी, भटजी, लाटजीच्या दावणीला आपली सत्ता कामी लावत असल्याचा प्रत्येय आजच्या बळीवंशाला येत आहे. हे मात्र खरे.

Leave A Reply

Your email address will not be published.