विवेक तोटेवार, वणी: रविवारी वणी पोलिसांनी घोंश्याला जाणारी दारू पकडली आहे. दुपारी 1 ते 1.30 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. यात दारू तस्कराकडून पाच देशी दारुचे बॉक्स तप्त करण्यात आले आहेत. ही दारू घोंसा या गावात चालली होती. या प्रकरणी रंगनाथ नगर येथे राहणा-या आरोपीला अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी वणीतील राजूर फाट्यावर दुपारी नजर ठेवली होती. दुपारी 1 ते 1.30च्या दरम्यान दोन इसम दुचाकी वाहनावर हिरव्या रंगाचा बॅगमध्ये दारू घेऊन जाताना दिसले. त्यांची गाडी थांबवून या गाडीवर असलेल्या बॅगची तपासणी केली त्यामध्ये देशी दारूचे पाच बॉक्स आढळून आले. याबाबत चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
सापडलेल्या मालाची किंमत 12 हजार 480 व यासाठी उपयोगात आणलेल्या दुचाकी एम एच 29 एच 0337 याची किंमत 20 हजार रुपये असा एकूण 32, हजार 480 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी आकाश शाम राठोड (22) राहणार रंगनाथ नगर, वणी याला अटक करण्यात आली असून त्यात्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यनुसार 65(अ)व(इ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पो उ नि जयप्रकाश निर्मल, विजय राठोड, विजय वानखेडे, अमित पोयाम व चालक प्रशांत आडे यांनी केली.