सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व अडेगाव इतर ठिकाणी अवैध दारू विक्री व विविध अवैध धंदे तत्कालीन ठाणेदार यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरू होते. याबाबत नवनियुक्त ठाणेदार अजित जाधव यांना माहिती होताच त्यांनी सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश संपूर्ण कर्मचाऱ्यांना दिले. कुणीही अवैध दारू विक्री करतांना किंवा इतर अवैध व्यवसाय करतांना आढल्यास त्याला पकडून ठाण्यात आणून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.
याच अनुषंगाने 6 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांच्यासह सहाय्यक फौजदार शशिकांत नागरगोजे,प्रवीण तालकोकुलवार मोहन कुडमेथे,जितेश पानघाटे, रंजना सोयाम, संतोष मडावी व संदीप बोरकर यांनी अडेगाव येथील निर्मला कामतवार वय 50 वर्ष ही महिला आपल्या राहत्या घरी अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी 8.45 वाजता रात्री छापा टाकला व घराची झडती घेतली असता 180 मिलीचे 30 शिष्या किम्मत 1800 जप्त करून सदर महिलेला ताब्यात घेण्यात आले.
तर पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना फोनद्वारे गोपनीय माहिती मिळाली की अडेगाव येथील हरिदास कामतवार वय 28 वर्ष हा गावात अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी हरिदास एक्सह्य घराची झडती घेतकी असता त्याच्या घरात 9 देशी दारूच्या बाटल्या किंमत 540 मिळाल्या यावरून त्यालाही ताब्यात घेतले.
मुकुटबन येथील सुरेश यादनवार वय 39 यांच्या घरी अवैध दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना रात्री फोनद्वारे मिळाली यावरून राठीड यांनी पोलीस कर्मचारी घेऊन रात्री 10.10 वाजता सुरेश यांच्या घराची झडती घेतली असता प्लास्टिक गोनिमध्ये देशी दारुचे 180 मिलीचे 48 शिष्या किंमत 2280 आढळून आल्या.
तसेच रूपेश संञा कंपनीचे देशी दारूचे 90 मिली क्षमतेने भरलेले सिलबंद 63 शिष्या प्लास्टीकचे प्रती किंमत 30 रु. असा एकुन 1890 चा माल असा एकुन 4770 चा मुद्देमाल मिळून आला. अवैधरित्या विनापरवाना देशी दारू बाळगल्याने सुरेश यादनवार विमल कामतवार व हरिदास कामतवार यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 65( ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आली. अवैध दारू विक्री करणार्यांवर ठाणेदार जाधव यांनी सुरू केलेल्या धडस्त्रामुळे अवैध व्यवसायकांची भंबेरी उडाली आहे.