सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करून ती तेलंगणात नेत असणारे 3 ट्रॅक्टर पाटण पोलिसांनी जप्त केले आहे. आज रविवारी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 18 हजारांची रेती व 12 लाखांचे 3 ट्रॅक्टर असा एकूण 12 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही चालकांना अटक करण्यात आली.
पाटणच्या ठाणेदार संगिता हेलांडे या आज दिनांक 6 मे रोजी सकाळी 5 वाजता गुड मॉर्निग गस्तमध्ये होत्या. दरम्यान त्यांना तालुक्यातील दुर्भा येथून पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या 3 ट्रॅक्टर द्वारे रेतीचोरी करून तेलंगणात नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस कर्मचारी सचिन गाडगे, अमित व होमगार्ड ब्रह्मानंद यांना सोबत घेतले. शासकीय वाहनाने ते 5.30 वाजताच्या सुमारास दुर्भा येथील पैनगंगा नदीच्या पात्रात पोहचले.
तिथे पोहोचताच त्यांना गावाला लागून असलेले पैनगंगा नदीचे कडेला तीन ट्रॅक्टर नदीपात्रातील ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये रेती भरून नदीपात्रातून दुर्भाकडील नदीपात्रातील रोडने जात असताना दिसून आले. दुर्भा गावाकडे चढणा-या कच्च्या रोडवर ठाणेदार हेलोंडे व पोलीस कर्मचारी यांनी तीनही ट्रॅक्टर थांबविले व पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर मध्ये रेती आढळून आली.
तीनही चालकांना रेती वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी बाबत विचारणा केली असता कोणतीही रॉयल्टी व रेती बाबत व वाहन चालविण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे चालक श्यामसुंदर संभाजी जाधव वय 23 वर्षे, योगेश्वर श्रीरंग जाधव वय 23 वर्ष व मरानाजी रामराव मारनुर वय 36 तिघेही रा. जुनी ता. इचोडा जि. अदिलाबाद यांच्या कडील ट्रॅक्टर क्र 1501 UA 4546 व ट्राली क्र. ISO1 UC 3522, ट्रॅक्टर TS 15 EB 6769 ज्याची ट्रॉली पिवळी आहे तर तिसऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली दोन्ही पांढ-या निळ्या रंगाचे आहे. तीनही ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशन आणून लावले.
तीनही ट्रॉली मध्ये प्रत्येकी एक ब्रास रेती ज्याची एकूण किंमत 18 हजार व 12 लाख रुपयांचे 3 ट्रॅक्टर असा एकून 12 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही चालक आरोपी यांना अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 379, 188 प्रमाने गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सोयाम करीत आहे.
महसूल विभाग झोपेत?
महाराष्ट्रातील पैनगंगा नदीपात्रातील रेती तेलंगणात मोठ्या प्रमाणात तसेच झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या रेती तस्करीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. पाटण पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी रेतीचोरांविरोधात टाच आवळली आहे. प्रशासनाने तालुक्यातील रेतीची तस्करी थांबवली पाहिजे अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा:
[…] […]