घरभाडे मागितले म्हणून घरमालकाला जबर मारहाण

दोन भाडेकरूसह तिघांवर गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी:  घर भाड्याचे पैसे मागितले म्हणून घरमालकाला लथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान शहरातील तेलीफैल येथे घडली. याप्रकरणी घरमालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन भाडेकरूंसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या घरमालकावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आला व नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.

फिर्यादी उदय संतोष कारिंगवार (19) रा. रंगनाथ नगर याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील तेलीफैल भागात त्यांचे वडिलांचे घर आहे. वडिलांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब रंगनाथ नगर येथे वास्तव्यास आहे. तर वडील संतोष भैय्याजी कारिंगवार हे तेलीफैल येथील घरातच राहतात. शुक्रवारी रात्री 12.30 वाजता दरम्यान वडिलांच्या घरात राहणाऱ्या एका महिला भाडेकरूने उदय याला फोन केला. तिने त्यांच्या वडिलांला दोन भाडेकरूनी वाद करून मारहाण केल्याचे सांगितले.

मारहाण झाल्याचे कळताच उदय तत्काळ तेलीफैल येथील घरी आला. तिथे त्याला वडील जखमी अवस्थेत पडून दिसले. याबाबत त्यांनी वडिलांना विचारणा केली असता त्यांच्या वडिलांनी भाडेकरू प्रदीप तुफाने केवट (37) रा. तेलीफैल, शेख रहीम शेख मुखत्यार (31) रा. तेलीफैल व भीम नगर येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे सांगितले.

भाडेकरू हे त्यांचे घरभाडे देत नव्हते. घरमालक सारखी घऱभाड्याची मागणी करतात याचा राग राग मनात धरून मारहाण केल्याचे जखमी वडिलांनी सांगितले. या मारहाणीत घरमालकाच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर आधी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला नंतर त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी तिनही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा: 

आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

Leave A Reply

Your email address will not be published.