(झाडे) सुतार समाज वणीच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव सोमवारी

रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज संस्था, (झाडे) सुतार समाज युवा मंच व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025ला ‘श्री प्रभु विश्वकर्मा जयंती’ साजरी होत आहे. सुतार समाजाचे आराध्य दैवत तथा शास्त्राचे देव अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यानिमित्त वणीतील सुतारपुरा येथील महादेव मंदिरात विविध कार्यक्रम होतील.

प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी 7.00 वाजता निघणाऱ्या शोभयात्रेच्या मार्गातील चौकाचौकांत रांगोळी स्पर्धा होईल. सकाळी 8.30  वाजता ध्वजारोहण अध्यक्ष अमन अ. बुरडकर यांच्या हस्ते होईल. नंतर सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत प्रभू विश्वकर्मा मूर्ती व प्रतिमेची शोभायात्रा सुतारपुरा येथील श्री महादेव मंदिरातून निघेल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गांधी चौक, जटाशंकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टागोर चौक, सर्वोदय चौक, भगतसिंग चौक, गाडगे बाबा चौक, नटराज चौक मार्गे महादेव मंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल. शोभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध देखावे, बँड पथक, बग्गी, समाजातील महिला पुरुष आदी राहील.

सकाळी 11.00 वाजता श्री प्रभू विश्वकर्मा पूजन श्रध्दा व अक्षय दौलतराव झिलपे यांच्या हस्ते होईल. महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम चहा व नास्त्याची व्यवस्था दुपारी 12.00 वाजता राहील. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सदस्या, झाडे सुतार समाज संस्था, वणी शारदा विजय झिलपे राहतील.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सचिव, देवराव सांबाशिव बुरडकर करतील. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय नीळकंठ देरकर यांची विशेष उपस्थिती राहील. प्रमुख पाहूणे म्हणून सदस्य महासंघ, उपाध्यक्ष (झाडे) सुतार समाज संस्था, वणी किसन आनंदराव दुधलकर, सुतार समाज संस्थेचे अध्यक्ष अमन अशोकराव बुरडकर, सुतार समाज महीला मंचच्या अध्यक्ष मंगला प‌द्माकरजी झिलपे, झाडे सुतार समाज युवा मंचाचे अध्यक्ष, रूपक संजय अंड्रस्कर राहतील.

दुपारी 1.30 वाजता समाजरत्न पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार होईल. दुपारी 2.00 वाजता समाज भांड्यांचे व जमा खर्चाचे विवरण तर दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत भोजनाचा कार्यक्रम होईल. सायं. 6.00 ते 9.30 वाजता समाजातील लहान मुलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम होतील. वरील सर्व कार्यक्रमांना सुतार समाज बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Comments are closed.