हाडांच्या विविध आजारांवर प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक येथे उपचार उपलब्ध

सुप्रसिद्ध रोबोटीक ऍन्ड कन्व्हेन्शनल Knee Surgeon डॉ. अविनाश देठे देतात रुग्णसेवा

बहुगुणी डेस्क, वणी: नुकतेच वणीतील साई मंदिर चौक जवळ प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक हे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सुरु झाले आहे. मुळचे आपल्या वणीतीलच व सुप्रसिद्ध रोबोटीक ऍन्ड कन्व्हेन्शनल Knee Surgeon डॉ. अविनाश देठे (MBBS, D. Ortho, FJRS (Mumbai)) हे येथे रुग्णसेवा देतात. स. 10 ते दु. 1 व संध्या. 6 ते 9 या वेळेत बाह्य रुग्ण तपासणी (ओपीडी) सुरु असते. अपघात, वयोमान इत्यादीमुळे आलेल्या हाडांच्या विविध समस्या इत्यादींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केला जातो. याशिवाय हाडांची विविध शस्त्रक्रिया देखील येथे केली जाते.

काय आहेत सेवा?
हाडांची शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर ट्रीटमेंट, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधीवात, हाडांचे विविध आजार, मणक्याचे आजार, हाता पायाला मुंग्या येणे, मानेचे दुखणे, प्लास्टर लावणे व काढणे यासह डिजिटल एक्स रे मशिनद्वारा हाडांचा एक्सरे देखील काढला जातो.

डॉ. अविनाश देठे हे मुळचे वणी येथील रहिवासी असून ते प्रगती नगर येथे राहतात. त्यांनी शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालय वणी तर ज्यु. कॉलेज एसपीएम महविद्यालय वणी येथून पूर्ण केले. अमरावती येथील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथून त्यांनी MBBS चे शिक्षण घेतले. तर डी. ऑर्थोचे शिक्षण त्यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध शताब्दी हॉस्पिटल येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्ष मुंबईतीलच नामवंत हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केली. त्यातच त्यांना Zen हॉस्पिटल मुंबई यांची (FELLOWSHIP In Knee Repalcement) फेलोशिप मिळाली आहे. विविध अनुभव व रिसर्चनंतर त्यांनी वणी व परिसरातील रुग्णांसाठी हॉस्पिटल सुरु केले आहे.

त्ता – प्रकाश ऑर्थोपेडिक क्लिनिक  
श्री साई मंदिर चौक, यवतमाळ रोड, नवीन समाधा डेली निड्सच्या बाजूला, वणी
अधिक माहिती व नंबर लावण्यासाठी मो. नं. 9209423636

Comments are closed.