भरधाव दुचाकीने गर्भवती महिलेला उडविले

अपघातानंतर दुचाकी ठेऊन चालक घटनास्थळावरून पसार

विवेक तोटेवार, वणी: मंगळवार 21 मे रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास दोन महिला व एक मुलगा हे प्रगती नगर येथे घरी चालले होते. दरम्यान भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ती 9 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार दुचाकी घटनास्थळी ठेऊन पसार झाला.

मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी हर्षदा हरीश चटप ही महिला एक सहकारी महिला व तिचा मुलगा हे वरोरा रोडवर स्थित प्रगती नगर येथे चालले होते. अगदी वळणावर ट्रीपल सीट जाणा-या एका भरधाव दुचाकीने (MH34 AN4325) हर्षदा यांना धडक दिली. या धडकेत हर्षदा यांचा पाय फॅक्चर झाला आहे. ती 9 महिन्याची गर्भवती असक्याचे समजते.

धडक देताच दुचाकीवर असलेल्या तिघांनी दुचाकी तेथेच ठेऊन धूम ठोकली. यातील दुसरी महिला व तिचा मुलगा हे सुखरूप आहेत. हर्षदा हिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात होताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सदर दुचाकी ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून चालकाचा शोध घेणे सुरू आहे.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

याच दुचाकीने वरोरा रोडवर स्थित रजिस्टार ऑफिस समोर एका इसमाला कट मारली. तर लोटी महाविद्यालयासमोर दुसऱ्या एका व्यक्तीला किरकोळ जखमी केल्याची माहिती आहे.

Comments are closed.