खासगी बाल रुग्णालयात भरती असलेल्या मुलांना असुविधा

आजारी मुलाला चादर नसलेल्या पलंगावर झोपवले

0

रवि ढुमणे, वणी: शहरात रुग्णालयाचे जणू पिकच आले आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात बाल रुग्णालय सपशेल अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ व्यवसाय म्हणून वैद्यकिय सेवेकडे डॉक्टर पाहताना दिसत आहे.

शहरात रुग्णालयाची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे. जिकडे तिकडे सुसज्ज रुग्णालये दिसायला लागली आहे. चार खाटा लावल्या की झाले रुग्णालय अशी काहीशी अवस्था झाली आहे. बसस्थानक परिसरातील नामांकित रुग्णालयात जीवनदायी योजनेच्या नावावर जणू रुग्णांची लूट सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातही एका बाल रोग तज्ज्ञांच्या तर तक्रारीचा पाढाच कमी पडतोय. चिंतातुर पालक आपल्या लेकराला आजारातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर कडे घेऊन येतात. याच संधीचा फायदा घेत रुग्णालय त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतात. मात्र त्यांना खर्चाच्या हिशोबाने सुविधा उपलब्ध करून देण्यास बहुतांश दवाखाने सपशेल अपयशी ठरले आहे.

असाच प्रकार बाजारपेठेतील बाल रुग्णालयात दिसून आला आहे. बालकाची प्रकृती बिघडल्याने पालकांनी त्याला बसस्थानक परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले. मात्र बालक ज्या बेडवर झोपला तेथे धड कापडी चादर नाही. केवळ रेक्सिनच्या गादीवर आजारी बालकाला कडकडीत थंडीत झोपवण्यात आले. रुग्णाला दाखल करून भरमसाठ बिल काढण्यात येते मात्र पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास हे रुग्णालये अपयशी ठरले आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा ही सेवा नसून आता व्यवसाय बनत चालली असून रुग्णांच्या आजारापणाचा फायदा घेत डॉक्टरांकडून त्यांची लूट होताना दिसत आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.