पोलीस भरती स्पर्धा परीक्षेचे (सराव) सोमवारी बक्षीस वितरण

पत्रकार दिनानिमित्त जागृत पत्रकार संघाद्वारे घेण्यात आली होती स्पर्धा

पुरूषोत्तम नवघरे, वणी: 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 1 जानेवारीला लोकमान्य टिळक महाविद्यालयात पोलीस भरती सराव परीक्षा घेण्यात आली होती. शहरातील जागृत पत्रकार संघाद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वणी विभागातून सुमारे 500 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. सोमवारी दिनांक 16 जानेवारीला सकाळी 11:00 वाजता वणीतील वसंत जिनिंग सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या परीक्षेत प्रथम द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे मुला व मुलीकरिता वेगवेगळे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उद्घाटक हंसराज अहिर असणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजीवरेड्डी बोदकूरवार राहणार आहे. टिकाराम कोंगरे, विजय चोरडिया, इझहर शेख, तारेंद्र बोर्डे, पी.एस. आंबटकर, संजय खाडे, माधवराव सरपटवार, राजू धावंजेवार, वैभव ठाकरे, प्रा.दिलीप मालेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर कार्यक्रमात विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जागृत पत्रकार संघाचे राजू धावंजेवार, संदीप बेसरकर, मो. मुश्ताक, विवेक तोटेवार, प्रशांत चंदनखेडे, पुरुषोत्तम नवघरे, गणेश रांगणकर, श्रीकांत किटकुले, मनोज नवले, प्रवीण नैताम, आकाश दुबे, राहुल आहुजा व ऍड अमोल टोंगे केले आहे.

Comments are closed.