आज स्व. रुधाजी देरकर यांचा स्मृती सोहळा

नंदेश्वर देवस्थान वणी येथे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आध्यात्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रांत त्यांचे मोलाचे योगदान असलेले स्व. रुधाजी केशवराव देरकर यांची आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी 6 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त वणीतील नंदेश्वर देवस्थान येथे स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी रुधाजी देरकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. 10.30 वाजता हिंगणघाट येथील कीर्तनकार कवडुजी तिखट महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आवाहन गयाबाई रुधाजी देरकर, संजय देरकर, सुनील देरकर आणि देरकर परिवारांतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.