60 हजारांच्या तंबाखूसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

जैन ले आऊटमध्ये सुरू होती तस्करी, एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 27 जानेवारी रोजी मध्यरात्री दरम्यान वणीत फाले ले आऊट येथील एक चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आढळून आला. पोलिसांनी सदर तंबाखू जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 2.5 लाखा़चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार वणीतील फाले ले आऊट येथे एका चारचाकी वाहनात बंदी असलेला मजा कंपनीचा तंबाखू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या ठिकाणी उभे असलेल्या मारुती सुझुकी सेलेरो वाहन क्रमांक MH 29 AR 5468 पाहणी केली. त्यामध्ये 500 ग्रॅम मझा तंबाखूचे 7 डब्बे, 200 ग्रॅम मजा तंबाखूचे 42 डब्बे, ईगल तंबाखूचे 6 पाऊच व खर्रा बनविण्याची पण्णी असा एकूण 63 हजार 670 रुपयांचा माल आढळला.

सोबतच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन किंमत 2 लाख असा एकूण 2 लाख 63 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये आरोपी मुनाल नवनाथ बेलेकर (34) रा. फाले ले आऊट, सानेगुरुजी नगर वणी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमने 2011, 26 (2) कलम 27, कलम 30 (2) (अ), 59, 188, 272, 328, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, प्रदीप परदेशी पोलीस अधीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी योगेश रंदे, अमोल कडू, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, महेश जाधव, सुधीर पिदूरकर, महेश फुके यांनी केली.

Comments are closed.