मोदी सरकार विरोधात वणीत जोरदार निदर्शने

लखीमपूर खीरी हत्याकांडाचा माकप, किसानसभेतर्फे निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शहरात लखीमपूर खीरी घटनेचा जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. माकप व किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 3 ऑक्टोबर 2021 रोजी शेतक-यांच्या मोर्चावर गाडी चढवल्याने यात 5 शेतकरी व एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा ह्याच्यावर आंदोलकांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. आरोपी विरोधात सबळ पुरावे, साक्ष असतानाही आरोपीला जामिनावर सोडणे, दोषारोप पत्र दाखल न करणे, आरोपीचा मोदी सरकार बचाव करीत आहे. असा आरोप या प्रकरणी झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आंदोलकांद्वारे देशभरात मंगळवारी काळा दिवस पाळण्यात आला. वणीत देखील याबाबत जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. मनोज काळे, गजानन ताकसंडे, प्रकाश घोसले, किसन मोहूरले, कवडू चांदेकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.