बहुगुणी डेस्क, वणी: सोरायसीस आणि त्वचाविकार अगदी चटकन लक्षात येत नाहीत. कधीकधी आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. मात्र हे योग्य नसल्याचं सर्वच तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. रविवारी यांची मोफत तपासणीची संधी चालून आली आहे. सर्वोदय चौकातील श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्रात मोफत “सोरायसिस व त्वचा विकार रोगनिदान शिबिर” आहे. हे शिबिर रविवारी दिनांक 2 मार्चला सकाळपासून रात्री 8.30 पर्यंत होईल.
रोगनिदानाकरीता शक्यतो उपाशीपोटी यावे. सोरायसिससारख्या दुर्धर व चिवट त्वचाविकारामुळे अख्खे कुटुंब उध्वस्त होते. सामाजिक जीवन अवघड होते. या व अशा आजारांवर वणी शहरात पुण्याच्या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व नाडी परीक्षण तज्ज्ञ वैद्य.सुवर्णा चरपे ह्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.
शिबिरातील पाच गरजवंतांना एका आठवड्याचे मोफत औषधी वितरण होणार आहे. शिवाय पंचकर्म सुविधेवर विशेष सवलत मिळेल. सोरायसिस व त्वचाविकार हे केवळ औषधोपचारांनी बरे होणारे आजार नाहीत. त्यांच्या समूळ उच्चाटनासाठी रक्तशुद्धी व मन:शांती, योग्य आहार गरजेचा आहे. तद्संबंधी मार्गदर्शन व डॉक्टरांकडून योग्य सल्ला उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी आपले मोफत रोगनिदान आयुर्वेदोक्त नाडी परीक्षणामार्फत करुन घेण्याची विनंती वैद्य. सुवर्णा चरपे यांनी केली आहे.
Comments are closed.