जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

मुकुटबन येथील सर्पमित्रांनी दिले जीवदान

0

सुशील ओझा,झरी: साधा साप जरी दिसला तरी, माणूस घाबरून पाणी पाणी होतो. जेव्हा डोळ्यांसमोर तब्बल 12 फूट लांब अजगर दिसतो, तेव्हाची परिस्थिती न विचारलेलीच बरी. नेमक्या यावेळी शेतकऱ्याने समयसूचकता दाखवली. त्याचा आणि सापाचाही जीव त्यामुळे वाचला.

त्याने सर्पमित्रांची मदत घेतली. मुकुटबन येथून 2 किमी अंतरावर असलेल्या रुईकोट शेत शिवारात आढळलेल्या १२ फूट लांब अजगर सापाला मुकुटबन येथील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. रुईकोट शिवारात शेती असलेले येथील शेतकरी मारोती खाडे यांच्या शेतात सायंकाळी ६ ते ७ वाजता दरम्यान अचानक १० ते १२ फूट लांब असलेला अजगर (सर्प ) दिसला.

अचानक एवढा मोठा अजगर दिसताच थिल वेळ शेतकरी खाडे अचंबित झाले. मुकुटबन येथील सर्पमित्र कार्तिक गोन्लावार याला फोन करून कळविले. कार्तिकसोबत त्यांचे मित्र हेमंत गेडाम, राउत,अंकुश कुंभजवार, यांनी या अजगराला पकडले आणि मुकुटबन येथील वनविभाग कार्यालयात आणले. कार्यालयातील कर्मचारी कुणाल सावरकर यांनी याची नोंद घेतली.

वरील सर्पमित्रांनी अजगराला जंगलात नेऊन सोडून दिले. अशाप्रकारे त्याला जीवनदान दिले. मुकुटबन येथील सर्पमित्र यांनी यापूर्वी अनेक सापांना पकडले व जीवदान दिले आहे. कुणाच्या घरी किंवा कुठेही साप आढळल्यास त्यांना मारू नये असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. आम्हाला बोलवा आम्ही सापाला जिवंत पकडून जंगलात सोडून देऊ त्याकरिता संपर्क साधण्याचेसुद्धा आवाहन केले आहे.

हेदेखील वाचा

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

हेदेखील वाचा

साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.