शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह

कोरोनाकाळात घ्यावी योग्य ती काळजी

1

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 04 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेत. वणीतील विठ्ठलवाडीत 1, राजूर काॅलरीत 1 तर लालगुडा येथे 1 रुग्ण शुक्रवारी आढळला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

शुक्रवारी यवतमाळ येथून 27 रिपोर्ट आलेत. शुक्रवारी 17 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. आलेल्या रुग्णांवरून 50 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 126 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 30 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 976 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 923 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. शुक्रवारी 11 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 30 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 16 जण होम आयसोलेट आहेत. 05 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 09 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

हेदेखील वाचा

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

 

 

1 Comment
  1. […] शुक्रवारी वणी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह […]

Leave A Reply

Your email address will not be published.