बोगस बियाणे विक्रीविरोधात पोलिसांचे धाडसत्र

साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी 29 मे रोजी सकाळच्या सुमारास वडकी येथे बोगस बियाणे विक्रीकरिता आणणाऱ्या दोघांना अटक केली. तर 27 मे रोजी वणी तालुक्यातील शिरपूर ठाण्याअतर्गत असलेल्या कायर पिंपरी येथून एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून बोगस बियाणे व इतर मुद्देमाल असा एकूण 8 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थागुशा हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की काही इसम हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथून एका चारचाकी वाहनात बोगस बियाणे विक्रीकरिता वडकी येथे आणत आहे. माहितीनुसार पोलिसांनी कृषी अधिकाऱ्याला सोबत घेऊन खैर बसस्थानाका जवळ सापळा रचला. माहितीनुसार एक ब्रेंझा कार क्रमांक MH41 AE6196 या वाहनाला थांबवून कृषी अधिकाऱ्यांसोबत झडती घेतली. गाडीच्या मागच्या सीटवर 33 किलो कपाशीचे बियाणे ज्याची किंमत अंदाजे 1 लाख 5 हजार रुपये आहे.

कारमधील लोकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांचे नाव विलास नानाजी देवेवार (40) व अविनाश संतोषाराव निकम (29) दोघेही रा. सावित्री पिंपरी असल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता सदर बियाणे हे सागर अरुण परलेवार रा. कोठारी ता. बल्लारशाह जि. चंद्रपूर यांच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडून गाडी, मोबाईल व बियाणे असा एकूण 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तिन्ही आरोपीविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशाच प्रकारची दुसरी कारवाई 27 मे रोजी वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. या कारवाईत अमोल विजय चिकनकर (33) रा. भालर हल्ली मुक्काम कायर पिंपरी याच्याकडून बलवान रिसर्च हायब्रीड कॉटन सिड 5 जि या अनधिकृत कंपनीचे 15 पॉकेट 18 हजार रुपये किंमतीचे बियाणे जप्त करण्यात आले. याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थागुशा, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मुडे, स्पोउपनी रामेश्वर कांडुरे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पिदूरकर, रजनीकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ राजेंद्र माळोदे, अमोल जोशी , प्रवीण जाधव, कल्याण पाटील सर्व कृषी विभाग यांनी केली.

Comments are closed.