रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

बनावट ग्राहक पाठवून कामगिरी फत्ते, एक महिला ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसरात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर येथे पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली तर देहविक्री व्यवसाय करून घेणा-या एका महिलेला अटक करण्यात आले आहे. मुकुटबनचे ठाणेदार अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील एक सेवाभावी संस्था आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही धाड टाकण्यात आली.

वणी शहराबाहेरील जत्रा मैदान भागात प्रेमनगर ही वारांगणांची वस्ती आहे. या वस्तीत एका अल्पवयीन मुलीला फूस लावून वेश्या व्यवसाय करून घेतले जात आहे, अशी माहिती नागपूर येथील फ्रीडम फर्म या सेवाभावी संस्थेला मिळाली. या संस्थेतील संचालक महिला आपल्या चमूसह वणीत दाखल झाली.

मुकुटबनचे ठाणेदार अनिल जाधव यांच्या नेतृत्वात संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास वारांगना वस्तीत पथक गेले. तिथे फ्रीडम फर्मच्या एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून आत पाठविले. त्यांनी अल्पवयीन मुलीशी सौदा केला. सौदा होताच बनावट ग्राहकाने पथकाला इशारा केला. इशारा करताच आधीच दबा धरून असलेल्या पथकांनी त्या घरावर छापा टाकला.

या कारवाईत ग्वालियर (मध्यप्रदेश) येथील एक अल्पवयीन मुलगी मिळाली. अधिक माहिती घेतली असता प्रेमनगर वस्तीतील लक्षीबाई सिसोदीया हि व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने लक्ष्मीबाईला ताब्यात घेतले. तिच्यावर वणी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 370, अनैतिक देह व्यापार कायदा (पिटा) 1956 च्या कलम 3,4,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा:

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

T-20 वर्ल्ड कपच्या मॅचवर सट्टा लावणारे पोलिसांच्या जाळ्यात

Comments are closed.