Alert- दोन दिवस नांदेपेरा रोडवरील रेल्वे गेट बंद

स. 11 ते सं. 5 पर्यंत राहणार बंद, वाहतूक वळवली

विवेक तोटेवार, वणी: रेल्वे रुळाच्या कामामुळे आज शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर व शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर या दोन दिवस स. 11 ते सं. 5 या वेळेत वांजरी (नांदेपेरा) रोड वरील गेट नंबर 1 हे बंद राहिल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. या मार्गावरून नांदेपेरा येथे जावे लागले. तसेच या रोडवरूनच स्वर्णलीला, मॅकरून, लॉयन्स या शाळेत जावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी वणी चिखलगाव बायपास किंवा वणी वरोरा बायपासचा वापर वाहतुकीस करावा, असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.