देव येवले, मुकुटबन: शनिवारी झरीसह तालुक्यातील अनेक गावात पावसानं दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या उष्ण वातावरणातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाळा संपत आला तरी झरी तालुक्यातील पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतक-यासह सर्वच पावसाची वाट पाहत होते. अखेर शनिवारी प्रतीक्षा संपली आणि पावसानं जोरदार पुनरागमन केलं.
(हे पण वाचा: रक्तपेढीच्या मागणीसाठी रक्तानं लिहिलं निवेदन)
झरीसह तालुक्यातील अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. या पावसानं शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला असला तरी शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मात्र शनिवारी वरुण राजा प्रसन्न झाल्यानं शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.