जनतेचे प्रेम हिच माझी संपत्ती – राजू उंबरकर

विविध उपक्रमांसह जल्लोषात वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. तर संध्याकाळी वणीतील शिवतीर्थ येथे फटाक्याची आतषबाजी करीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हजारो लोकांनी उंबरकर यांना शुभेच्छा देण्यास गर्दी केली होती.

 

सर्वसामान्यांचे प्रेम हिच संपत्ती – राजू उंबरकर
यावेळी मनोगत व्यक्त करताना राजू उंबरकर म्हणाले की लहान मुलांपासून, तरुण-तरुणी, महिला भगिनी आणि वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत दिसणारे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो. सरतेशेवटी धन, संपत्तीचा हव्यास क्षुल्लक असून लोकांचा आपल्यावर असणारा लोभ हीच खरी संपत्ती असल्याची जाणीव नव्याने झाली. येत्या काळात ही संपत्ती शतगुणीत होवो, असे प्रतिपादन राजू उंबरकर यांनी कार्यक्रमावेळी केले.

Birthday ad 1

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध शाखेत सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला सेनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षरोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त विदर्भासह वणी विधानसभा क्षेत्रात राबवले.

Comments are closed.