भाऊ म्हणून कायम सोबत असणार, राजू उंबरकर यांचे बहिणींना वचन

शेकडो महिलांच्या उपस्थितीत वसंत जिनिंगमध्ये पार पडला रक्षाबंधन उत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मनसे नेते राजू उंबरकर यांना ग्रामीण भागातील व वणी शहरातील शेकडो भगिनी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आपुलकीने राखी बांधतात. गेल्या 16 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी वसंत जिनिंग येथे यावर्षी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजू उंबरकर भावूक झाले होते. त्यांनी भाऊ म्हणून कायम सोबत राहणार, असे वचन बहिणींना दिले.

राजू उंबरकर यांनी अनेक पूरग्रस्त गावांना मदत केली आहे. अनेक मुलींच्या शिक्षणाचा खर्च ते करतात. यासह विविध आजार आणि अडल्या नडल्यांना ते कायम मदत करतात. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदत केली होती. याची जाणीव म्हणून शेकडो महिला त्यांना दरवर्षी राखी बांधतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.

यावर्षी वसंत जिनिंग येथे दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उंबरकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाले होते. तुमचा भाऊ म्हणून मी कायम पाठिशी राहणार, असे वचन त्यांनी दिले. ओवाळणीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी राजू उंबरकर यांच्या पत्नी, तसेच मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामीण भागातील व शहरातील 400 पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.

Comments are closed.