दडवून ठेवलेल्या अनेक रहस्यांचा आज 26 एप्रिलला होईल गौप्यस्फोट

▫️"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्य समाजवाद" विषयावर प्रबोधन

बहुगुणी डेस्क, वणी: समाजातील अनेक रहस्य, गुपितं कधीच समोर येत नाही. ही काही जण त्यांच्या स्वार्थासाठी, लाभासाठी मुद्दाम दडवून ठेवतात. भारतातील जातीवाद व धर्मांधवादाने देशातील संतांना आणि महापुरुषांना जातींमध्ये व धर्मांमध्ये विभागलं. त्यामुळे त्यांचे मूळ आपण स्वीकारत नाही. केवळ बाह्य अवडंबर करून आपण त्यांची जयंती किंवा अन्य उत्सव साजरे करतो. यामागील कारणांवर चर्चाच होत नाही. दिशाभूल करणाऱ्यांच्या षडयंत्रांची चाहूल ते लागू देत नाही. अशा अनेक बाबींचा पर्दाफाश करण्यासाठी शनिवार दिनांक 26 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता प्रबोधन कार्यशाळा होणार आहे. ही प्रबोधन कार्यशाळा राजूरच्या बुद्ध विहारा जवळ मंहिला मंडळ हॉलमध्ये होईल. अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष हे “डॉ. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद” या विषयावर कार्यशाळेत प्रबोधन करतील. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी पंस सदस्य अशोक वानखेडे असतील. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विद्या डेव्हिड पेरकावार, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, पोलीस पाटील वामन बल्की, महादेव तेडेवार, दीक्षाभूमी बुद्धविहारचे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम, मारोती पाटील बलकी, अनिल डवरे, दिनेश बलकी उपस्थित राहणार आहे.

महापुरुषांचे विचार जनमानसात रुजायला हवेत. अलीकडे व्यवस्था पुरोगामी न होता प्रतिगामित्वाकडे वळत आहे. व्यक्ती तर्कशील, विवेकवादी होण्याऐवजी अंधभक्त होत चालला. शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या पुढ्यात अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मूळ समस्या समजून घेणं आवश्यक आहे. हाच धागा पकडून येथील राजूर विकास संघर्ष समितीने पकडला. संत व महापुरुषांनी दिलेले विचार, त्यांनी विचारांसोबत केलेल्या कृती ह्यांचा अंगीकार करावा यासाठी हे प्रबोधन होईल. या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची विनंती राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, जयंत कोयरे, राहुल कुंभारे, अमित करमणकर, नंदकिशोर लोहकरे, बंडू ठमके, महेश लिपटे, विजय तोताडे व अन्य सदस्यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.