रुग्णच रुग्ण चोहीकडे, गं बाई डॉक्टर गेले कुणीकडे…

राजूर येथे केंद्राचे डॉक्टर एक आठवड्यापासून गैरहजर

0

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या एका आठवड्यापासून डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या राजूर वासियांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

याआधी दोन महिने राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या त्यांनी प्रा. आ. केंद्राला ताला ठोको आंदोलन केले होते. अखेर इथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ताबडतोब इथे डॉक्टरची नियुक्ती केली होती. इथे नव्यानेच रूजू झालेले डॉ उघडे हे मागील एक आठवड्यापासून गैरहजर आहे. त्यामुळे इथल्या रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.

राजूर कॉलरीची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे इथे रुग्णांची संख्याही अधिक आहे. येथील आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.

या विषयी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कुमार मोहरमपुरी म्हणाले की….

डॉ उघडे हे कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिका-यांनी दिली आहे. तर डॉ उघडे यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोन लागत नाही. तर तालुका अधिकारी डॉ कांबळे यांच्याकडे अतिरिक्त कामे असल्याने ते राजूर प्रा. आ. केंद्राला ओपीडी काढण्याकरिता सकाळी उशिरा येतात व सायंकाळी येतच नाहीत. त्यामुळे रुग्णांची काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले तर प्रां. आ. केंद्राला कायमस्वरूपी कुलूप बंद आंदोलन केले जाईल. असा इशारा डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे, अनिल डवरे, जयंत कोयरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.