आज व उद्या वणीत गीत रामायणाचा कार्यक्रम

शुक्रवारी भव्य नेत्रचिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: गुढीपाडव्यापासून वणीत प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी व गुरुवारी दिनांक 6 व 7 एप्रिल रोजी इंदोर येथील अभय मानके यांचा संगीतमय गीत रामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम जुनी स्टेट बँकसमोरील राम मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावावी असे आवाहन जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर पहिल्यांदाच जन्मोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रभू रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी अभिलाष राजूरकर यांच्या स्वरसाज गृपतर्फे भक्तीसंगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी दिनांक 5 एप्रिल रोजी सप्तखंजेरीवादक उदयपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. बुधवारी व गुरुवारी संध्याकाळी गीत रामायानाचा कार्यक्रम होणार आहे.

भव्य नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन
गणेशपूर येथील श्रीविनायक मंगल कार्यालय येथे भव्य नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 11 ते सं. 5 वाजेपर्यंत होणार आहे. तर संध्याकाळी राम मंदिर येथे नागपूर येथील सचिन ढोमणे व सुरभी ढोमणे यांचा सुरसंगीत हा भक्ती व भावगितांचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला आहे.

शनिवारी दिनांक 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मनु महाराज तुगनायत आणि संच यांचा संगीतमय सुंदरकांड पाठ या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम जन्म या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी व श्रोत्यांनी हजेरी लावावी असे आवाहन प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती वणी द्वारा करण्यात आले आहे.

Comments are closed.