बहुगुणी डेस्क, वणी: भव्य दृश्यरचना, दमदार संगीत आणि अजरामर महाकाव्याची थरारक सिनेमॅटिक अनुभूती देणारा बहुप्रतीक्षित ‘रामायण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणबीर कपूर यांची प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील दमदार उपस्थिती, साई पल्लवीची सीतेची भूमिका आणि यशचा रावणाच्या रूपातील अवतार यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट 5 नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे. वणी येथील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट रोज 3 शोमध्ये पाहता येणार आहे. शो टाइम्स : दुपारी 12 दुपारी 4 आणि रात्री 9 वाजता असे राहणार आहेत.
अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची कथा?
वाल्मिकी रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभू श्रीरामांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि धर्मरक्षणाचा प्रवास भव्य स्वरूपात मांडण्यात आला आहे. अयोध्येचा राजकुमार राम यांना वनवासाला जावे लागते. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही वनवासात जातात. याच प्रवासात रावणाकडून सीतेचे अपहरण होते आणि त्यानंतर राम व रावण यांच्यातील संघर्षाला सुरुवात होते. सीतेच्या सुटकेसाठी प्रभू श्रीरामांनी उभारलेला संघर्ष, वानरसेनेची साथ आणि अधर्मावर धर्माच्या विजयाची गाथा या कथानकाचा केंद्रबिंदू आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार आहेत.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.