श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था आता वडसा देसाईगंजमध्येही

पतसंस्थेच्या 16 व्या शाखेचे जेसाभाऊ मोटवाणी यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेचा मंगळवार 20 डिसेंबर रोजी थाटात शुभारंभ झाला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथे 16 व्या शाखा उघडण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवाणी यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

श्री रंगनाथ स्वामी पत संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकुटबन, वणी ग्रामीण, यवतमाळ, आर्णी, घाटंजी, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, मूल, वरोरा, गडचांदुर, चिमूर, ब्राह्मपुरी या ठिकाणी शाखा कार्यरत आहे. तब्बल 800 कोटीच्या ठेवी, 451 कोटी कर्ज वाटप व 872 कोटी खेळते भांडवल असलेल्या या विशाल वटवृक्ष रुपी संस्थेत 58 हजार सभासद आहे. राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे लॉकर सुविधा, आरटीजीएस, एनईएफटी व एसएमएस सुविधा संस्थेच्या खातेदारांना उपलब्ध आहे.

रंगनाथ स्वामी पतसंस्थेकडून आपल्या खातेदारांना स्थावर गहाण कर्ज, गृह कर्ज, ठेव तारण कर्ज व वाहन कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. विशेष म्हणजे तत्काळ पैश्याची गरज असलेल्या ग्राहकांसाठी आकर्षक व्याज दरावर सोने तारण कर्ज (गोल्ड लोन) योजना रंगनाथ स्वामी पतसंस्थेकडून सुरु करण्यात आली आहे. मुदत ठेव योजनेत 364 दिवसांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांना 9 टक्के एवढे व्याज दिले जाते.

मनोगत व्यक्त करताना ऍड देविदास काळे

रंगनाथचा वृक्ष असाच बहरत राहणार – ऍड देविदास काळे
प्रास्ताविकात काळे यांनी 32 वर्षांपूर्वी एका 10 बाय 10 च्या खोलीतून सुरू झालेल्या पतसंस्थेचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. आज पतसंस्थेच्या 15 शाखा व दोन स्वत:च्या मालकीच्या इमारतीही उभ्या केल्या. आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थांच्या कार्यभारावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या सर्वांचा समतोल साधून रंगनाथ स्वामी पतसंस्था आपल्या सभासदांच्या विश्वासार्हतेवर खरी उतरली आहे. यापुढेही रंगनाथचा वृक्ष असाचा वाढत राहणार, असे मनोगत देविदास काळे यांनी व्यक्त केले.

वडसा देसाईगंज शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, उपाध्यक्ष विवेक मांडवकर, कार्यकारी प्रबंधक संजय दोरखंडे, वडसा देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, किसन नागदेवे, तालुका काँग्रेस कमिटीचे डॉ. विनोद नाकाडे, नगरसेवक दीपक झरकर, उद्योजक रवींद्र सिंग सलुजा, संदीप कोयटे, माधवराव पाटील, संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व वडसा ग्रामवासी उपस्थित होते.

Comments are closed.