बोटोणी येथे क्रांतीवीर शामादादा कोलाम जयंती व संविधान दिन साजरा

माजी सैनिक मोहन मडावी व आनंदराव मसराम यांचा सत्कार.... बुरांडा परिसरात जिल्हाधिकारी यांची भेट

सुरेश पाचभाई, बोटोणी: क्रांतीवीर शामादादा कोलाम यांची 123 वि जयंती आणि संविधान दिन बोटोणी येथील गावात व पोडात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक मोहन मडावी व आनंदराव मसराम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल सिडाम होते तर प्रमुख पाहुणे नामदेव आत्राम होते.

गोविंदा टेकाम, हरिभाऊ उईके, हिरामण कोडापे, हुसेन सुरपाम, गणेश आत्राम, नामदेव जुनगरी, सुभाष सागोरे, विनोद कोडापे, तुकाराम आस्वले, पुंडलिक राऊत, भवानी जांभुळकर इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गणेश कुमरे यांनी केले तर राहुल किनाके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी युवा संघटना बोटोणीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बुरांडा परिसरात जिल्हाधिकारी यांची भेट
जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांची बोटोणी परिसरातील सराटी व बुरांडा (खु) इ. गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला कोरोना लसिकरणाबाबत घरो घरी जावून 100 टक्के लसिकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार दीपक पुंडे तालुका आरोग्य अधिकारी अर्चान देठे, ठाणेदार राजेश पूरी यांची उपस्थिती होती. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी ग्रामसेवक तसेच गावातील सरपंच व नागरिकांशी संवादही साधला. बुरांडा परिसरात भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांचा ताफा मारेगावच्या दिशेने रवाना झाला.

हे देखील वाचा:

…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

Comments are closed.