नरसाळा येथे महाकाकड आरतीची सांगता

गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महाकाकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मोहनराव देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटेला येथील हनुमान मंदिरातून काकड आरतीची टाळ मृृदुंगाच्या गजरात मिरवणूक निघाली. गावातील सर्व लोक यात उत्साहाने सहभागी झाले. शनिवारी या महाआरतीची सांगता झाली. यावेळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पुजारी मारोती बोढे, विणेकरी नारायणराव ताजणे, मृदंग वादक गोविंदराव सूर्तेकर, रामदासजी देशपांडे, सुरेशराव दुर्गे, प्रकाश मत्ते, प्रवीण मत्ते, अरविंद मत्ते, गजानन कडूकर, अशोकराव गायधण, तुळशीराम बोढे, आदिनाथ उईके, कैलास मेश्राम, बाबाराव खाडे, पांडुरंग देवाळकर, विष्णू मत्ते, गजानन, रामकृष्ण नेहारे, चंद्रभान ठाकरे, कवडू किनाके, आशिष पांडे व समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

Comments are closed.