पाटण येथील लाखो रुपयांचा आरओ प्लान्ट दोन वर्षांपासून धुळखात

वॉरंटी पिरिएडमध्ये संपत असूनही प्लान्टची दुरुस्ती नाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील आरओप्लान्ट दोन वर्षांपासून बंद असल्याने वॉर्ड क्र. 1 मधील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही ठेकेदार व कंपनी याकडे दुर्लक्ष करीत  आहे. विशेष म्हणजे या आरओ प्लान्टच्या मशिनचा वॉरंटी पिरिएड संपत असूनही अद्याप दुरुस्ती केली जात  असल्यानेु

प्राप्त माहितीनुसार पाटण येथील पोलीस स्टेशन समोर 2 वर्षांपूर्वी खनिज विकास निधी अंतर्गत एक आरओ प्लान्ट बसविण्यात आला. मोठा गाजावाजा करत आमदार यांच्या हस्ते आरओ प्लान्टचे उदघाटनही करण्यात आले. उदघाटन करण्यापूरतेच फक्त प्लान्ट सुरू करण्यात आला. उदघाटन झाल्यानंतर केवळ 2 तासच आरोप्लान्ट मधून फिल्टर पाणी आले त्यानंतर आरओ प्लान्ट बंद असल्याचा गावक-यांचा आरोप आहे.

2 वर्षे लोटूनही अजून पर्यंत जनतेला प्लान्टचे शुद्ध पाणी जनतेला मिळाले नाही. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे. तर ठेकेदार आपली झोळी भरून गायब झाला आहे. याकडे संबंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधींचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.

पाटण ग्रामपंचायतने लाईनची व नळाद्वारे पाण्याची व इतर व्यवस्था करून दिली आहे. फिल्टर आरओप्लान्टची वॉरंटी संपत आहे. आरओ प्लान्ट लावणा-या कंपनीच्या टेक्निशिअनने अजूनपर्यंत प्लांटकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची ओरड गावकरी करीत आहे. पोलीस स्टेशन समोरील आरोप्लान्ट सुरू करण्याकरिता ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतला लेखी तक्रार केली आहे. तकाराईच्या अनुषंगाने 15 दिवसात सदर आरओप्लान्ट सुरू करावे असे पत्र पंचायत समिती व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतने केली आहे.

….तर ग्रामपंचायतीच्या खर्चातून प्लान्ट दुरुस्त करणार: सरपंच
पोलीस स्टेशन समोरील आरोप्लान्ट खनिज विकास निधीतील असुन ते बंद अवस्थेत आहे. आरोप्लान्ट सुरू करण्याकरिता गावातील लोकांची तक्रार प्राप्त झाली आहे. पंचायत समिती व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे 15 दिवसाच्या आत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 15 दिवसात आरओप्लान्ट सुरू न झाल्यास ग्रामपंचायतद्वारा खर्च लावून आम्ही आरोप्लान्ट सुरू करून ग्रामवासीयांना पाण्याकरिता शुद्ध पाणी उपलब्द्ध करून देऊ : प्रशांती कासावार, सरपंच

हे देखील वाचा:

1 सप्टेंबरपासून नोकरीवर न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा

बेपत्ता झालेले बँकेचे ब्रँच मॅनेजर अकोल्यात सुखरूप

Comments are closed.