वाटमारी प्रकरणात हेल्परच निघाला मास्टर माइंड

मित्रांना सोबत घेऊन रचला कट, असे फुटले बिंग...

विवेक तोटेवार, वणी: 16 मे रोजी तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) येथे संध्याकाळी वाटमारी करण्यात आली होती. अँपेचा चालक व हेल्पर याला मारहाण करून 80 हजार रोख व मोबाईल चोरट्यानी नेला होता. मात्र या प्रकरणी मारहाण झालेला हेल्परच मास्टर माइंड असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी हेल्पर लक्ष्मण शंकर मेश्राम (21) रा. पंचशील नगर (मुळ रहिवासी वरोरा) यांच्यासह
वैभव उर्फ कुणाला अनिल निखाडे (19) रा. इंदिरा चौक वणी, अभिषेक बळीराम मेश्राम (21) रा. नायगाव, राहून सुनील राजूरकर (24) रा. नायगाव यांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.

राजेश तारुणा यांचे वणीतील विराणी टॉकीज परिसरात वाहेगुरू नावाने किराणा होलसेलचे दुकान आहे. ते वणी तालुक्यातील ग्रामीण भागात किराणा माल विकतात. याकरता त्यांनी एक अँपे वाहन घेतले आहे. त्यांच्याकडे जितेंद्र तुळशीराम रिंगोले हा चालक म्हणून काम करतो. तर त्याला मदतनीस म्हणून लक्ष्मण शंकर मेश्राम हा होता. लक्ष्मण हा महिनाभरा आधीच कामाला लागला होता. ते ग्रामीण भागात माल पोहोचवून त्याची वसुली करायचे.

16 मे जितेंद्र व लक्ष्मण नेहमी प्रमाणे अॅपेने माल घेऊन रासा, घोन्सा, झरी परिसरात गेले होते. सायंकाळी माल वाटप व वसुली करून परत येत असताना कोरंबी (मारेगाव) येथील शाळेजवळ चार जणांनी त्यांच्या अँपे समोर दोन दुचाकी आडवे टाकून वाहन थांबवले. या चौघांनी चालक व हेल्पर दोघांनाही मारहाण केली. तसेच चालकाच्या गळ्यातील 80 हजार रोख रक्कम असलेली बॅग व लक्ष्मण याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर ते रासाच्या दिशेने निघून गेले. याबाबतची तक्रार चालक जितेंद्रने वणी पोलिसात दिली. या प्रकरणी भदंविच्या कलम 394 नुसार गुन्हा दाखल केला 

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

असे फुटले बिंग…
वणी परिसरात अनेक वर्षानंतर वाटमारीचा प्रकार घडला होता. त्यामुळे कुणीतरी परिचितांचे हे काम असावे असा पोलिसांना संशय होता. हेल्पर लक्ष्मण हा नुकताच कामाला लागला असल्याने पोलिसांनी सर्वात आधी लक्ष्मणचे कॉल डिटेल काढले. यात त्यांना लक्ष्मण दिवसभरात काही जणांच्या सारखा संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी लक्ष्मणला ताब्यात घेतले. आधी त्याने सहकार्य करण्यास असमर्थता दाखवली. मात्र पोलिसी खाक्या मिळताच त्याने सर्व घटनाक्रमच उलगडला. पोलिसांनी लक्ष्मणच्या मित्रांना ताब्यात घेतले असता. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

संशय येऊ नये म्हणून स्वत:च खाल्ला मार
या प्रकरणात वाटमारी करणा-यांनी संशय येऊ नये म्हणून हेल्पर व चालक दोघांनाही मारहाण केली. मात्र चालकाला अवजड दांड्याने डोक्यावर प्रहार करण्यात आला होता. मात्र मार खाऊनही अखेर कॉल डिटेल व लोकेोसन ट्रेसिंग वरून हेल्परचे बिंग फुटलेच. या प्रकरणी वापरण्यात आलेली एक मोपेड ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींवर भादंविचे 395 व 120 ब असे वाढीव कलम लावले. चौघांपैकी एक आरोपी अद्यापही फरार आहे. आरोपीचा शोध वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.