12 वी विज्ञान शाखेत वैभवी महाकुलकर व अमिषा पारोधी तालुक्यातून प्रथम

वाणिज्य शाखेची शालू बन्सल सर्वाधिक गुण घेत तालुक्यात प्रथम

 

विवेक तोटेवार, वणी: आज 12 वि स्टेट बोर्डचा निकाल जाहीर झाला. यात वणीतून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची शालू सुनील बन्सल ही 91.76 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विज्ञान शाखेची वैभवी विजय महाकुलकर व एसपीएम कनिष्ठ महाविद्यालयाची अमिषा अंकुश पारोधी या दोघीही समान 86.17% गुण घेत विज्ञान शाखेतून तालुक्यातुन प्रथम आल्या आहेत. तर कला शाखेत लोटी महाविद्यालयाची विश्वाता राजू पारचाके 76.67% घेत शहरातून प्रथम आली आहे. तर वणी पब्लिक महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची काजल उमेशचंद्र कोचर ही 91.50% गुण घेत कॉलेजमधून प्रथम तर तालुक्यातून द्वितीय आली आहे. यावर्षी संपूर्ण तालुक्यातून 1854 विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेत बसले. यापैकी 1854 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 1550 म्हणजे 83.60% विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे कला, वाणिज्य, विज्ञान व एमसिव्हीसी यांचा 83.29% इतका निकाल लागला आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्राची योगेश्वर ताजने 83.33% गुण घेत द्वितीय तर अनुष्का पुरूषोत्तम रोडे 83.17% घेत तृतीय आली आहे. तर वाणिज्य शाखेत धनश्री अरुण गोहणे 89.83% द्वितीय तर दुर्गा रवींद्र देवाळकर 88.50 तृतीय आली आहे.

कला शाखेत स्नेहा बाबुराव बोढे 72.83% घेऊन द्वितीय तर साक्षी बंडू आस्वले 70.33% गुण घेऊन तिसरी आली आहे. एमसिव्हीसी शाखेत साहिल ज्ञानेश्वर मालेकार 83% गुण घेऊन प्रथम आला आहे. अभय श्रीकांत नागतुरे 78.50% द्वितीय तर सुधांशु दत्तादास वासेकर 78% घेऊन तृतीय आला आहे.

एसपीएम कनिष्ठ महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतील अथर्व पंजाब बेलूरकर 78.50% गुण घेऊन द्वितीय तर अंजली वामन बलकी 78.33 % घेऊन तृतीय आली आहे. येथील कला शाखेची निर्लेपा शंकर वासेकर हि 68.83% गुण घेऊन प्रथम आली आहे. प्रतीक्षा शंकर बोबडे 66.17% द्वितीय तर मामीरानाज आलम खान 65.33% गुण घेऊन तृतीय आली आहे.

वणी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये लक्ष योगेश कुमरावत याने 80.33% गुण घेत पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. महेक अजय लाल 64.50% द्वितीय तर मानसी राजेश पाटील 62.83% तृतीय आली आहे. तर वाणिज्य शाखेत 19 विध्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात तर खुशी हेमंत सहारे 89.50% द्वितीय व मोहिनी मारोती खोकले 89.17% तृतीय आली आहे.

लॉयन्स इंग्लिश मिडीयम ज्युनिअर सायन्स कॉलेजचा 89.65% निकाल लागला आहे. या महाविद्यालयातील जिज्ञासा संतोष उपाध्ये हि 64.67% इतके गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे. हर्षल विजय गारघाटे 60.50% द्वितीय तर पंचम सोहम मडावी 60.33% गुण घेऊ तृतीय क्रमांक पटकावला आहे. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाचा 79% निकाल लागला आहे. तर नुसाबई चोपणे कनिष्ठ महाविद्यालयाचा 94.54% निकाल लागला आहे.

Comments are closed.