लाखापूर येथे राजू उंबरकर यांच्या तर्फे स्वखर्चाने रस्त्याचे काम

पांदण रस्ता तयार झाल्याने शेतक-यांची गैरसोय थांबली

बहुगुणी डेस्क, वणी: लाखापूर तालुका मारेगाव येथील जनतेच्या हिताचा विचार करत, राजू उंबरकर यांनी आपल्या पुढाकाराने आणि स्वखर्चातून पाणंद रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतक-यांची होणारी गैरसोय थांबणार आहे. स्वखर्चातून पांदण रस्ता तयार करून दिल्याने शेतकरी बांधवांनी राजू उंबरकर यांचे आभार मानले.

लाखापूर येथे रस्त्याची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची कैफियत घेऊन राजू उंबरकर यांच्या कार्यालय गाठले. त्यांनी पाणंद रस्ता तयार करून देण्याची मागणी केली. सध्या शेती चांगली बहरली असून शेतातील पिके ही सुद्धा काही दिवसातच काढणीला येणार आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अडचण येत असल्याची अडचण त्यांना सांगितली.

सदर बाब गांभीर्याने लक्षात घेऊन राजू उंबरकर यांनी त्वरित त्याच दिवशी दुपारी जाऊन सदर पाणंद रस्त्याचे काम चालू केले. या पाणंद रस्त्यामुळे शेती, बाजारपेठ, शाळा आणि अन्य गरजेच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना मोठी सोय झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका झाली आहे, ज्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गावकऱ्यांनी त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, सर्वांगीण विकासासाठी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्न भविष्यातही असाच सुरू राहील व आगामी काळातील निवडणुकीच्या वेळेस राजू उंबरकर यांना प्रचाराची गरज भासणार नाही एवढा मोठा जनसमुदाय राजू उंबरकर यांच्या पाठीशी उभा आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.