मध्यरात्री दरोड्यावर होता नेम; पण पोलिसांनी केला गेम

शिरपूर पोलिसांनी केली अशी करामत की, सर्व आरोपी अटकेत

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 15 जुलैची ती रात्र होती. सुमारे 1 वाजले होते. दरोडेखोरांची पूर्ण तयारी झाली होती. मात्र शिरपूर पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. चिंचोली परिसरात दबा धरून असलेल्या व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना अटक केली. या 7 आरोपींकडून 2 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शिरपूर पोलिस दिनांक 15 जुलै रोजी रात्री परीसरात मोहरम सण असल्याने सपोनि/माधव शिंदे ठाणेदार शिरपूर यांच्या आदेशान्वये पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान ठाणेदार माधव शिंदे यांना एक गुप्त माहिती मिळाली. चिंचोली परीसरात 6 ते 7 इसम दरोडा घालण्यासाठी दबा धरुन बसलेले आहेत. अशा खात्रिदायक माहितीवरुन त्यांनी पो.स्टे. चे पोउपनी रावसाहेब बुधवत व पो. स्टॉफ यांना वरील कारवाई करिता पाठविले.

त्यांनी रात्री 1 वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी पोहचलेत. घेराव घालून नमूद आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये अनिल कल्लु निशाद (27), सुनील कल्लू निशाद (30) दोन्ही रा. रामनगर, शास्ती राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर, नीलेश मनोहर बावणे (25) रा. मुंगोली ता. वणी जि. यवतमाळ, एक विधीसंघर्ष बालक यामध्ये तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झालेत.

यामध्ये बंडल निषाद (28) रा. रामनगर, शास्ती राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर, प्रफुल चौधरी (25) रा. घुग्गुस ता.जि. चंद्रपुर, संकेत भौजेकर (21) वर्षे रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडून दरोड्याचे साहित्य, जसे की, लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेन्चिस, पेचकस आदी अंदाजे 42 हजार 170 रूपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले.

सोबतच एक पांढ-या रंगाची इंन्डीगो मांझा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक MH 09 BM.0133 किंमत 2 लाख रुपये असा एकुण 2 लाख 42 हजार एकशे 170 रुपयांचा मुद्देमाल आरोपीक़डुन जप्त केला. त्यांच्यावर कलम 310 (4), 310 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला. या घटनेतील फरार आरोपी संतोष उर्फ बंडल शिवप्रसाद निषाद, प्रफुल्ल महादेव चौधरी, संकेत विलास भौजेकर ना तात्काळ अटक करण्यात शिरपूर पोलिसांनी यश मिळाले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, यवतमाळ. पीयूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, रामेश्वर बैंजणे पांढरकवडा, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील सपोनि माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवत, पोहेकॉ सुनील दुबे, पोहवा गंगाधर घोडाम, पोहवा प्रशांत झोड, नापोकॉ नीलेश भुसे, नापोकॉ गजानन सावसाकडे, पोका अमित पाटील, पोकॉ विनोद मोतेराव, चालक पोकॉ विजय फुल्लुके यांनी पार पाडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.