वणी येथील दाम्पत्याला लुटणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

वर्धा पोलिसांनी माहूरगड येथन 9 आरोपीना केली अटक, 2 वाहनासह 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी:  खिळ्याचा लाकडी पट्टा रस्त्यावर टाकून चारचाकी वाहनांना लुटणारी दरोडेखोरांची टोळीला वर्धा पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथून अटक केली आहे.  याच टोळीने 7 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता दरम्यान नागपूर चंद्रपूर महामार्गावर जांबजवळ वणी येथील पालीवाल दाम्पत्य आणि कार चालकाला बेदम मारहाण करून 65 हजाराचा ऐवज लुटला होता. दरोडेखोरांच्या या टोळीने नागपूर, वर्धा, नाशिक व राज्यात अनेक ठिकाणी नॅशनल हायवेवर अशाच प्रकारे दरोडे टाकल्याचे उघडकीस आले आहे.

वर्धा पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार या टोळीने 3 एप्रिल रोजी इंदूर धुळे मार्गावर बाभाळे फाट्याजवळ नाशिक येथील कैलाश जाधव कडून रोख व सोन्याचे दागिने असे 1 लाख 30 हजार 500 रुपयांचा एवज जबरीने चोरून नेला. दि. 6 एप्रिल रोजी अमरावती नागपूर महामार्गावर चक्रीघाटापुढे सारवाडी गावाजवळ भंडारा येथील उरकुडे कुटुंबियांना या टोळीने काठीने मारहाण करून जखमी करून अंगावरील सोन्याचे दागिने व नगदी असे एकूण 1 लाख 78 हजाराचा माल याच टोळीने लुटून नेले. त्यानंतर 7 एप्रिल रोजी नागपूर चंद्रपूर महामार्गावर वणी येथील दाम्पत्याकडून दरोडेखोरांनी 65 हजाराचा एवज लांबविला होता. 

हायवे रोड रॉबरीचे सलगपणे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक वर्धा यांनी सदर गुन्हयांची गांभीर्य पुर्वक दखल घेवुन स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना तपासकामी मार्गदर्शन करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत निर्देश दिले. मुखबिर कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वर्धा पोलिसांच्या एका पथकाने शुक्रवार 8 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथून दरोडेखोर टोळीच्या 9 जणांना शिताफीने अटक केली. पोलिसांनी दरोडेखोरांकडून सिल्वर रंगाची एसयुव्ही-500 कार क्र.(MH25R 3927) व बोलेरो वाहन क्र. (MH13AC 8082) सह सदर वाहनांमध्ये 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे किं. 7 लाख 75 हजार, 450 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे किं. 27 हजार,  नगदी रक्कम 41 हजार 150 रूपये, 7 मोबाईल किं. 47 हजार रु., दोन  असा एकुण 24 लाख 69 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी आरोपी बबलु अप्पा शिंदे (28), दत्ता सुंदर शिंदे (35), अमोल आप्पा शिंदे (32), सुनिल लहु काळे (22), महादेव अंन्सार काळे (24), सर्जेराव तात्याजी शिंदे (25), लहु राजेंद्र काळे (45), उत्तम सुंदर शिंदे (50) व विकास संजय शिंदे (21) सर्व  राहणार जि.उस्मानाबाद याना अटक करून पुढील तपासकामी पोलीस कोठडी मिळविली आहे.

सदरची कामगीरी वर्धाचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे सपोनि महेंद्र इंगळे, पोउपनि अमोल लगड, पोउपनि राम खोत, सफौ. प्रमोद जांभुळकर, संतोष दरगुडे, निरंजन वरभे, गजानन लामसे, नरेंद्र डहाके, हमीद शेख, चंदु बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, रणजित काकडे, प्रमोद पिसे, यशवंत गोल्हर, राजेश जैयसिंगपुरे, गोपाल बावणकर, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अभिजीत वाघमारे, अमोल ढोबाळे, नितेश मेश्राम, अविनाश बन्सोड, संजय बोगा, अनिल कांबळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेष आष्टणकर, निलेश कट्टोजवार, अक्षय राउत, अंकित जिभे, अरविंद येनुरकर, वैभव चरडे, रवि पुरोहित, अमोल चौधरी मनापोशि शाहीन सैयद, स्मिता महाजन यांनी केली

Comments are closed.