गोवर आणि रुबेला जनजागृती संवाद सभा
सुरेन्द्र इखारे, कायर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा संपूर्ण देशात गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय भारत सरकारने केला. यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना एमआरची लस टोचून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी रुबेलाच्या जनजागृतीसाठी येथील विवेकानंद विद्यालयात संवादसभा झाली. यावेळी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे एएनएम एस. बी. नंदगावे व एलएचव्ही ए. व्ही. मेश्राम, मुख्याध्यापिका रेखा मडावी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला या लसीच्या संदर्भातील लक्षणे व उपाय याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले.मोहीम यशस्वी करण्याकरिता मधुकर घोडमारे सतीश घुले, संजय तेलंग, सुरेन्द्र इखारे, नोडल शिक्षिका सोनाली भोयर, रविकांत गोंलावार, अविनाश ठाकरे, योगेश सातेकर यांनी सहकार्य केले.