रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला… 18 नंबर पुलियाजवळ कारवाई

तालुक्यात रेती तस्कर ऍक्टिव्ह, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणी मुकुटबन रोडवरील 18 नंबर पुलीयाजवळ रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर वणी पोलिसांनी पकडला. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले असून रेतीसह 7 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आशिष हेमराज गिरसावळे (32) रा. सेलू खुर्द याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 फेब्रुवारी रोजी वणी-मुकुटबन मार्गावर पेट्रोलिंग करताना 18 नंबर पुलियाजवळ पोलिसांना सकाळी 6 वाजताच्या सुमारास विना नंबरचा एक ट्रॅक्टर रेती घेऊन येताना दिसला. पोलीस पथकाने सदर ट्रॅक्टरला थांबवले. पोउनि धीरज गुल्हाने यांनी रेतीच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र चालकाकडे रेतीचा परवाना नव्हता. चालकाला नाव विचारले असता त्याने आशिष हेमराज गिरसावळे (32) रा. सेलू खुर्द असे सांगितले. तसेच सदर रेती ही वरझडी येथील नाल्यातून आणल्याचे त्याने सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चौकशीत चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने सदर रेतीची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जॉन डिअर कंपनीचा ट्रक्टर हेड विना क्रमांक व विनाक्रमांकाचे ट्रॉलीसह किंमत अंदाजे किंमत 7 लाख रुपये व रेती किंमत 7 हजार असा एकूण 7 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक आशिष गिरसावळे यांच्यावर कलम 303 (2) भा.न्या.सं. सहकलम 48 (8) जमीन महसूल कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.