मारेगाव येथे नवीन महाविद्यालय सुरु, B.A. B.Com व B.Sc. साठी प्रवेश सुरु

संकेत महाविद्यालय मारेगाव, अमरावती विद्यापीठ मान्यताप्राप्त कॉलेज

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संकेत महाविद्यालय, मारेगाव येथे बीए, बीकॉम व बीएससीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. मारेगाव शहरातील डॉ. महाकुलकर कॉम्प्लेक्स येथे नव्याने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या सर्व शासकीय सवलत या महाविद्यालयाला लागू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक माहिती व प्रवेशासाठी त्वरित 9834836751, 9423435114 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात किमान 4 ते 5 महाविद्यालय आहेत, परंतु मारेगाव तालुक्यात अवघे एकच सिनियर कॉलेज आहे. त्यामुळे 12 वी नंतर विद्यार्थ्यांना बाहेर तालुक्यात शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. बाहेरगावी जाऊन किरायाने रूम करून राहणे त्रासदायक आणि खर्चिक असते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व गरज लक्षात घेऊन मारेगाव शहरात फुले, आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान, मारेगाव द्वारा संचालित (र.नं.2815 ) संकेत वरिष्ठ महाविद्यालय, मारेगाव हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत असलेले महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. डॉ. महाकुलकर कॉम्प्लेक्स येथे हे महाविद्यालय आहे.
या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता सकाळी 10 ते 5 पर्यंत या कालावधीत खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे:
प्रवेशासाठी संपर्क – 9834836751, 9423435114, 9765779544, 9823545642

Comments are closed.