….आणि ते सगळेच एकमेकांशी चक्क संस्कृतमध्ये बोलायले लागलेत

प्रणिता भाकरेंच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गिरवलेत संस्कृत संभाषणाचे धडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेकांचे आपल्या मातृभाषेतच अस्खलित बोलण्याचे वांधे होतात. मात्र आपली भाषाच नसलेल्या संस्कृतमध्ये जेव्हा शिबिरार्थी बोलायला लागलेत. तेव्हा सगळेच अवाक झालेत. ही किमया साधली प्रा. प्रणिता भाकरे यांच्या विद्यार्थ्यांनी. तेही केवळ सात दिवसांच्या संस्कृत प्रशिक्षण शिबिरातून.

संस्कृत भाषा ही भारतीय भाषा आहे. यात अन्य भाषांसारखेच ज्ञानाचे भांडार आहे. सर्वसामान्यांपर्यंत ही भाषा पोहचवण्याचा प्रयत्न संस्कृत भारती करीत आहे. या संस्थेच्या वणी शाखेद्वारा आर्य वैश्य महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शरद कोंडावार यांचे निवासस्थानी दि. 16 ते 23 मार्च या कालावधीत संस्कृत संभाषण वर्ग झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या वर्गाच्या समारोपला ज्येष्ठ पत्रकार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार प्रमुख अतिथि स्वरूपात उपस्थित होते. संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. आपण संस्कृतचे अध्ययन केले तरच आपण आपल्या संस्कृतीला समजून घेऊ शकतो. तसेच तिचे रक्षण करु शकतो. संस्कृतचा अभ्यास केल्यास बुद्धी प्रगल्भ होते. उच्चार शुद्ध होतात.

तसेच आत्मविश्वास निर्माण होतो, असे प्रतिपादन गजानन कासावार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन आर्य वैश्य महिला आघाडीच्या अध्यक्षा कीर्ती कोंडावार यांनी केले. तर आभार वर्गशिक्षिका प्रा. प्रणीता भाकरे यांनी केले. समारोप कार्यक्रमात ईश्वरी सुत्रावे, आराध्या वैद्य, राजेश्वरी कोंडावार, ममता गंगशेट्टिवार, जयश्री यांनी संस्कृत सम्भाषणाचे प्रात्यक्षिके सादर केलीत.

Comments are closed.