वणी: संस्कृत भारतीच्या वतीने संस्कृतसप्ताहाच्या निमित्ताने संस्कृत वेषभूषा स्पर्धा तथा संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लिटिल फ्लॉवर , सरस्वती तथा निवेदिता या तीन शाळांच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा खोब्रागडे सौ. प्रिया भिवलकर तथा सौ.किरण कुंचमवार यांच्या प्रयत्नाने ह्या संस्कृत भाषेत आयोजित अभिनव स्पर्धा संपन्न झाल्या.
या कार्यक्रमाला सौ. संगीता भंडारी तथा सौ. कीर्ती कोंडावार प्रमुख अतिथी रूपात उपस्थित होत्या. यात आराध्या येरोजवार पारस सुत्रावे, शुभ निकुरे, समृद्धी खंडाळकर यांनी वेषभूषा स्पर्धेत सहभाग घेतला. आर्यन संदुरकर ने गांधीजी तथा शिवांश गोहणे, पियुष पटेल, श्रावणी संदुरकर यांनी साकारलेली तीन माकडे खूप वहावा मिळवून गेली.
संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत ज्ञानदा दातारकर पूर्वा गोहणे, वंद ढुमणे, आर्या तिवाडे, श्रावणी व आर्यन सुंदरकर, समृद्धी खंडाळकर आद्या देवगडे आराध्या येरोजवार उर्वशी घोडाम रोहन पटेल राजेश्वरी कोंडावार पारिजात घाणेकर दूर्वांक आगलावे शर्वरी सोनकुसरे यश कमोलेकर संजना मुथ्थावार सुखदा बिवलकर पार्थ पारखी तथा पलक अटारा या चिमुकल्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे आयोजन तथा सूत्रसंचालन सौ. रेणुका अणे यांनी केले. यशस्वितेकरिता सौ. प्रणीता भाकरे, सुरभी उंबरकर, गायत्री भाकरे यांनी परिश्रम घेतले