पुरुषोत्तम नवघरे, वणी: ज्यांच्या लीलांनी वणी परिसर समृद्ध झाला, असे संत जगन्नाथ महाराज. त्यांचे या परिसरासह संपूर्ण देशभरात असंख्य अनुयायी आहेत. त्यांचे संपूर्ण संगीतमय जीवनचरित्र या गुढिपाडव्याला अनुभवायला मिळणार आहे. श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र यांच्या वतीने रविवारी गुढीपाडव्याला संगीत आणि नाटय महोत्सव 2025 आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गुढिपाडव्याला रविवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 05 ते 10 वाजेपर्यंत वसंत जिनिंग ऑफिस समोरील शेतकरी लॉन येथे होणार आहे.
आयोजकांच्या प्रयत्नांतून श्रोत्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतील. त्यामध्ये श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे गायन होईल. संत जगन्नाथ महाराज यांचे संगीतमय जीवन चरीत्र सादर केले जाईल. सर्वांना खळखळून हसवणारा प्रा. हेमंत चौधरी आणि पुरुषोत्तम गावंडे यांचा हास्यदर्पण कार्यक्रम होणार आहे. विशेष पर्वणी म्हणून स्वरमंथन बहुद्देशिय संस्था नागपूर येथील 70 कलाकार संत गजानन महाराजांवर आधारित ‘शेगावीचा संत गजानन’ हे महानाटय सादर करतील.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी तसेच वणी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था मिळून कार्य करीत आहे. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरीता वणी आणि परीसरातील सर्व श्रोत्यांनी आवजून उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक सविता डोर्लीकर, डॉ. संचिता नगराळे, वीणा मोहितकर, कान्होपात्रा खंडाळकर, अल्का लाजूरकर, सुनिता आवारी, वंदना पिंपळकर, भाग्यश्री तोडेवार, अजित खंदारे, सतीश बाविस्कर, अरूण डवरे, संतोष जोशी, प्रा.हेमंत चौधरी, संतोष किंगरे यांनी केली आहे.
Comments are closed.