पुरुषोत्तम नवघरे, वणी: “ऐसा चाहूं राज मैं, जहां मिलै सबन को अन्न। छोट-बड़ो सब सम बसै, रैदास रहै प्रसन्न॥” हे महामानव संत रविदास महाराजांचं स्वप्न होतं. त्यांनी संपूर्ण विश्वाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदर्श दिला. त्यांचा जयंती उत्सव 14 आणि 15 फेब्रुवारीला वणीत साजरा होत आहे. त्यानिमित्त दोन प्रबोधन पर्वांची मेजवानी वणीकरांना मिळणार आहे.
गुरू रविदास जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी, जिल्हा यवतमाळ, संत रविदास प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारीला फुले, शाहू, आंबेडकरी विचारवंत ख्यातनाम वक्त्या सुषमा अंधारे ह्या “प्रबोधन पर्व पहिले” अंतर्गत आपले विचार मांडतील.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खा. प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सरोज, एकविरा बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष किरण देरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश अध्यक्ष मीना भागवतकर राहतील. विशेष अतिथी अंजली भानुदास विसावे असतील.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महिला आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनिता लांडगे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ, युवती आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रणोती बांगडे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती राहील. हे प्रबोधन पर्व 14 फेब्रुवारीला सायंकाळी 4.00 वाजता वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री संत रविदास प्रबोधन केंद्रात होईल.
संत रविदास महाराज जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी सकाळी वणी शहरातील मुख्य मार्गाने आकर्षक अशी भव्य अभिवादन रॅली निघेल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ” प्रबोधन पर्व दुसरे ” आयोजित करण्यात आले आहे. हे प्रबोधन पर्वदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री संत रविदास प्रबोधन केंद्रात होईल.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांचे राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप राहतील, यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय देरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजुस्कर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या जयंती उत्सवात चर्मकार समाजातील कर्तुत्त्ववान महिला, शारीरिक अपंगत्त्व असलेल्या महिला, विधवा महिला आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान होणार आहे. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी केले आहे.
Comments are closed.